12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च

ASUS ने गेल्यावर्षी गेमिंग स्मार्टफोन म्हणून ROG Phone सादर केला होता जो फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आला होता आणि त्यात हाईएंड स्पेसिफिकेशन्स होते. कंपनी या फोनचा नवीन वर्जन घेऊन येणार आहे. आधीच बातमी समोर आली आहे कि कंपनी येत्या 23 जुलैला ASUS ROG Phone 2 टेक मंचावर लॉन्च करेल. हा फोन सध्या चीनी बाजारात सादर केला जाईल जो नंतर इतर मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच आज फोन लॉन्चच्या आधीच हा डिवाईस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट झाला आहे.

ROG चा अर्थ Republic of Gamers. ASUS चा ROG Phone 2 पण गेमिंग डिवाईसच्या स्वरूपात येईल. अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि असूस 23 जुलैला चीनच्या बिजिंग मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून ROG Phone 2 टेक मंचावर सादर केला जाईल. लॉन्च डेटची माहिती देण्यासोबतच या रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते कि हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यातील एका वेरिएंटची किंमत 4,399 युआन म्हणजे इंडियन करंसीनुसार जवळपास 44,300 रुपये असेल. आता गीकबेंचच्या लिस्टिंग मध्ये ROG Phone 2 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

लिस्टिंग डिटेल

गीकबेंच वर ASUS ROG Phone 2 ASUS_I001DC मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. याआधी हा फोन वाई-फाई अलायंस, एनसीसी आणि 3सी वेबसाइट वर पण याच मॉडेल नंबर सह समोर आला होता. सर्वात आधी गीकबेंच स्कोर बद्दल बोलायचे तर तिथे ROG Phone 2 ला सिंगल-कोर मध्ये 3616 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये ROG Phone 2 ला 11103 स्कोर देण्यात आला आहे.

लिस्टिंग नुसार ASUS चा हा पावरफुल फोन क्वालकॉमच्या ताकदवान स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. तर ROG Phone 2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित असेल, सोबतच फोन मध्ये 12जीबी चा दमदार रॅम दिला जाईल. गीकबेंच वर फोन डिस्प्लेची माहिती तर नाही पण बेंचमार्किंग साइट वर असे समोर आले आहे कि ASUS ROG Phone 2 मध्ये 120हर्ट्ज रेट वाला नॉच नसलेला डिस्प्ले दिला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone 2 पण गेमिंग डिवाईसच्या स्वरूपात बाजारात येईल. फोन बद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार ROG Phone 2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. या वेरिएंट्स मध्ये एक रॅम वेरिएंट 10जीबी रॅमला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12जीबी रॅम दिला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

ASUS ROG Phone 2 एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाऊ शकतो तसेच प्रोसेसिंग साठी फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात फास्ट आणि पावरफुल प्रोसेसर स्नॅपड्रॅगॉन 855 मिळू शकतो. या फोन मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले मिळू शकतो. त्याचबरोबर असूसच्या आगामी स्मार्टफोन मध्ये इंप्रूव गेम कूल सिस्टम, चांगला कॅमेरा आणि मोठ्या बॅटरी सह फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here