फ्लॅगशिप चिपसेटसह Realme फोन झाला गीकबेंचवर लिस्ट, जाणून घ्या पूर्ण माहिती

Highlights

  • Realme फोन RMX3851 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • यात 14.94 जीबी (सुमारे 16जीबी) रॅम स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • हे स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीज चिपसह असू शकते.


रियलमी येत्या काही दिवसांमध्ये एक नवीन फ्लॅगशिप लेव्हल डिवाइस बाजारात आणू शकते. परंतु फोनचे नाव अजून समोर आले नाही, परतुं याला Realme RMX3851 मॉडेल नंबरसह बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर स्पॉट करण्यात आले आहे. ज्यात याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे तुम्हाला लिस्टिंग आणि अन्य माहिती सविस्तर सांगतो.

Realme RMX3851 फोन गीकबेंच लिस्टिंग

  • नवीन फोनचा मॉडेल नंबर पाहता हा RMX3851 सह गीकबेंचवर समोर आला आहे.
  • गीकबेंच लिस्टिंग नुसार या डिवाइसने सिंगल कोर टेस्टमध्ये 1512 आणि मल्टी टेस्टमध्ये 3799 अंक मिळवले आहेत.
  • प्रोसेसरच्या माहितीवरून असे समजते की डिवाइसच्या चिपसेटचा कोड नेम ‘pineapple’ आहे. म्हणजे की हा डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीज चिपसह असू शकतो.
  • वरती दिलेल्या माहितीनुसार फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 लाइट किंवा स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट असू शकते.
  • या प्रोसेसर सोबत डिव्हाइसमध्ये ग्राफिक्ससाठी एड्रिनो 735 जीपीयू मिळण्याची चर्चा आहे.
  • डाटा स्टोर करण्यासाठी रियलमीचे नवीन मॉडेल 14.94 जीबी (सुमारे 16जीबी) रॅम स्टोरेजसह दिसत आहे.

Realme 12+ 5G लवकर होईल भारतात लाँच

गीकबेंच प्लॅटफॉर्मवर समोर आलेल्या या फोनच्या सोबत कंपनी येत्या काही दिवसांमध्ये Realme 12+ 5G भारतात घेऊन येईल. याला घेऊन काही दिवसांपूर्वी एक नवीन टीजर दिसला होता. अपेक्षा केली जात आहे की हा स्मार्टफोन मार्च महिन्यामध्ये भारतात सादर होईल. तर याची एंट्री मलेशियामध्ये 29 फेब्रुवारीला कंफर्म झाली आहे.

Realme 12+ 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: Realme 12+ 5G मध्ये युजर्सना 6.67 इंचाचा फ्लॅट अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन मिळण्याची संभावना आहे.
  • प्रोसेसर: डिव्हाइसमध्ये परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 चिपसेट लावले जाऊ शकते.
  • स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
  • कॅमेरा: हा नवीन रियलमी फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह असू शकतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तसेच, सेल्फी घेण्यासाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लावला जाऊ शकतो.
  • बॅटरी: Realme 12+ मध्ये युजर्सना 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 67 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.
  • ओएस: Realme 12+ 5G स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित रियलमी युआय 5.0 वर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here