लयभारी! 15 हजारांच्या बजेटमध्ये 108MP Camera असलेला Moto G72 फोन; पुढील आठवड्यात लाँच

108 Megapixel Camera Phone Motorola Moto G72 India Launch On 3 October

Moto G72 Launch: मोटोरोलानं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सर्वात पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर केला होता. हा प्रीमियम सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु आता कंपनी बजेट सेगमेंटकडे वळत असल्याची बातमी आली आहे. Motorola कंपनी येत्या 3 ऑक्टोबरला Moto G72 भारतात लाँच करणार आहे. मोटोरोलानं या फोनच्या लाँचची घोषणा केली आहे तसेच मोटो जी72 चं प्रोडक्ट पेज देखील शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलं आहे. लाँचपूर्वीच कंपनीनं खुलासा केला आहे की Moto G72 108MP Camera, 120Hz pOLED Display, MediaTek Helio G99 आणि 5,000mAh Battery सह बाजारात येईल.

Moto G72 India Launch

मोटोरोलानं आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट करून सांगितलं आहे की कंपनी भारतात आपल्या ‘जी’ सीरीजचा विस्तार करणार आहे आणि येत्या 3 ऑक्टोबरला मोटो जी72 भारतीय बाजारात लाँच करेल. हा फोन 3 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता ऑफिशियल होईल तसेच लाँचनंतर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन Meteorite Grey आणि Polar Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: सेल्फी प्रेमींना आवडेल ‘हा’ फोन! 60MP Selfie Camera असलेला Infinix Zero 20 लाँच; किंमत परवडणारी

Moto G72 Specifications

मोटोरोला मोटो जी72 स्मार्टफोन पीओएलईडी पंच होल डिस्प्लेवर लाँच केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 576हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. हा फोन स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल ज्यात 1300निट्स ब्राइटनेस, डीसीआई पी3 कलर गामुट आणि एचडीआर 10 सपोर्ट मिळेल.

Moto G72 अँड्रॉइड 12 वर लाँच होईल जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपेसटवर चालेल. भारतीय बाजारात मोटो जी72 स्मार्टफोन 6GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 storage सह दाखल होईल. मोटो जी72 आयपी52 रेटिंगसह येईल आणि यात डॉल्बी अ‍ॅटमॉस ऑडियो टेक्नॉलॉजी देखील मिळेल.

108 Megapixel Camera Phone Motorola Moto G72 India Launch On 3 October

फोटोग्राफीसाठी मोटो जी72 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर 108 मेगापिक्सलचा असेल. त्याचबरोबर बॅक पॅनलवर एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो सेन्सर मिळेल. पावर बॅकअपसाठी Moto G72 मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: OPPO भारतात सादर करणार तीन स्वस्त फोन A17, A17K आणि A77S; इतक्या कमी किंमतीत होणार एंट्री

Moto G72 Price

Moto G72 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती कंपनीनं आपल्या ट्विटर हॅन्डलवरून दिली आहे परंतु किंमत मात्र सांगितली नाही. उपरोक्त स्पेक्स हा आगामी Moto G72 स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये भारतीयांच्या भेटीला येईल. अधिकृत किंमतीसाठी आपल्याला येत्या 3 ऑक्टोबरच्या लाँचची वाट पाहावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here