OPPO भारतात सादर करू शकते तीन नवीन फोन A17, A17K आणि A77S; किंमतीही लीक

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

OPPO नं आपली बजेट सेगमेंट स्मार्टफोन रेंज मजबूत करण्याची योजना बनवली आहे. कारण कालच आम्ही OPPO A17 ची माहिती दिली होती. तर आज आम्हाला ओप्पोच्या नवीन फोन A17K बद्दल एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे, ज्यात स्पेसिफिकेशनपासून डिजाइन पर्यंतचा खुलासा करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आमच्याकडे OPPO च्या तीन नवीन फोन्सची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. बातमीनुसार, कंपनी दसऱ्याच्या निमित्ताने तीन नवीन फोन OPPO A17, OPPO A17K आणि OPPO A77S लाँच करू शकते. आम्हाला ही माहिती ऑफलाइन रिटेलरच्या माध्यमातून मिळाली आहे जिथे हे फोन 10 हजार ते 18 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकतात.

OPPO A17, OPPO A17K आणि OPPO A77S ची लीक प्राइस

या तिन्ही ‘A’ सीरीज स्मार्टफोन्सच्या माध्यमातून ओप्पो भारतात एंट्री लेव्हल, लो बजेट आणि मिड बजेट कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. OPPO A17K यातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल जो 10,499 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. त्यानंतर OPPO A17 चा नंबर येईल ज्याची किंमत 12,499 रुपये असू शकते. तसेच OPPO A77S ची किंमत या फोन्समध्ये सर्वात जास्त असेल आणि हा स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त ओप्पो स्मार्टफोनमध्ये मिळणार 7GB रॅम; OPPO A17k चे फुल स्पेसिफिकेशन आणि फीचर्स लीक

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

  • OPPO A17k – 3GB RAM + 64GB Storage = 10,499
  • OPPO A17 – 4GB RAM + 64GB Storage = 12,499
  • OPPO A77s – 8GB RAM + 128GB Storage = 17,999

OPPO A17K चे लीक स्पेसिफिकेशन

OPPO A17K चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये 6.56 इंचाची एचडी+ स्क्रीन मिळू शकते. हा फोन खूप स्लिम असू शकतो आणि याची जाडी फक्त 8.29mm असू शकते आणि वजन फक्त 189 ग्राम. मिळालेल्या माहितीनुसार फोन अँड्रॉइड 12 वर लाँच केला जाऊ शकतो जो कलर ओएस 12.1 आधारित असू शकतो. कंपनी हा फोन 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करू शकते.

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

बजेट सेग्मेंटच्या या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G35 प्रोसेसर मिळू शकतो ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 2.3गीगाहर्ट्ज असू शकतो. रॅम आणि रोम पाहता कंपनी याला 3GB RAM सह 64 GB स्टोरेजमध्ये सादर करू शकते. तसेच याचा एक मॉडेल 4GB RAM मध्ये देखील येऊ शकतो. या फोनमध्ये तुम्हाला रॅम प्लस सपोर्ट मिळेल जिथे तुम्ही 7GB पर्यंतच्या RAM चा वापर करू शकाल. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते जी 10 वॉट फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकते.

OPPO A17 चे लीक स्पेसिफिकेशन

OPPO A17 चे स्पेसिफिकेशन पाहता, फोन देखील A17K सारखा आहे फक्त कॅमेरा वेगळा असू शकतो. यात कंपनी ड्युअल रियर कॅमेरा देऊ शकते आणि मेन कॅमेरा एफ/1.8 अपर्चरसह येऊ शकतो 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

ओप्पो ए17 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशनसह 6.56 इंचाची स्क्रीन मिळू शकते. हा फोन देखील MediaTek Helio G35 चिपसेटवर चालू शकतो आणि यात 4जीबी रॅमसह 4GB एक्सटेंडेड रॅम सपोर्ट मुळे तुम्हाला एकूण 8 जीबी पर्यंत रॅमचा वापरता येऊ शकतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते जी 10W फास्ट चार्जिंगसह येऊ शकते. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone मध्ये देखील मिळणार 5000mAh ची बॅटरी; Jio Phone 5G च्या फीचर्सचा खुलासा

OPPO A77S चे लीक स्पेसिफिकेशन

OPPO A77S पाहता हा फोन थोडा महाग आहे परंतु त्यानुसार स्पेसिफिकेशन देखील मिळू शकतील. फोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. कंपनीनं फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो तर सेकंडरी कॅमेरा 2MP चा डेप्थ सेन्सर असू शकतो. सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा HDR सपोर्टसह मिळू शकतो. यात कंपनी क्वॉलकॉमची मदत घेऊ शकते. हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर चालू शकतो जो 6nm फॅब्रिकेशन बेस्ड आहे. तसेच फोनमध्ये 8GB RAM असू शकतो जो RAM प्लसच्या मदतीनं वाढवता येऊ शकतो. त्याचबरोबर 128GB ची मेमरी मिळू शकते.

Oppo A17 A71K And Oppo A77s India Retail Price And Details Exclusive

ओप्पो ए77एससाठी कंपनी ओप्पो ग्लो डिजाइन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकते. हा फोन स्क्रॅच रजिस्टेंटसह येऊ शकतो. पावर बॅकअप पाहता फोनमध्ये तुम्हाला 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here