15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप

Jio Low Cost Laptop Launch At Rs 15000 With 4G Enabled SIM Reports

JioBook Laptop Launch: टेलीकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणारी कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) आपली 5G सर्व्हिस भारतात दिवाळीच्या आधी लाँच करणार आहे. Jio 5G लाँच सोबतच JioBook laptop ची माहिती देखील समोर येऊ लागली आहे. रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानी ह्यांची कंपनी रिलायन्स जियो आता 4 जी सिमसह एक बजेट लॅपटॉप लाँच करणार आहे, ज्याची किंमत 15000 रुपये असेल. Reuters च्या बातमीनुसार हा लॅपटॉप स्वस्त किंमतीच्या जोरावर ग्राहकांना आकर्षित करेल.

JioBook Laptop

रायटर्सनं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की हा बजेट लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जियोनं क्वॉलकाम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या टेक कंपन्यांशी भागेदारी केली आहे. क्वॉलकाम कंपनी आर्म लिमिटेडच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेला चिपसेट लॅपटॉपमध्ये वापरला जाईल. लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज ओएसला सपोर्ट देखील दिला जाईल. काही रिपोर्ट्सनुसार या लॅपटॉपमध्ये क्रोम ओएस किंवा अँड्रॉइड ओएस देखील मिळू शकतो.

Jio Low Cost Laptop Launch At Rs 15000 With 4G Enabled SIM Reports

रिलायन्स जियोनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु तुम्हाला आठवत असेल की यंदा रिलायन्सनं 45th Annual General Meeting (AGM) दरम्यान आपल्या Jio 5G लाँचची माहिती देत असताना गुपचूप JioBook laptop देखील टीज केला होता, ज्यामुळे लॅपटॉप मार्केटमध्ये ‘जियोबुक’ लॅपटॉप येण्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. हे देखील वाचा: 210GB डेटा आणि 105 दिवसांची वैधता असलेला BSNL चा स्वस्त प्लॅन; Airtel-Jio कडे नाही असा प्लॅन

JioBook चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Reliance JioBook किफायशीर कंप्यूटिंग सेगमेंटला लक्ष्य करेल आणि त्यामुळे या लॅपटॉप मधील हार्डवेयर देखील त्यानुसार देण्यात येईल. JioBook मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 665 (SM6125) चिपसेट दिला जाऊ शकतो, तसेच हा डिवाइस Android ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन मॉडिफाइड व्हर्जनवर काम करू शकतो. ज्याला JioOS असं नाव दिलं जाऊ शकतं, इथे कंपनीची गुगल सोबत केलेली भागेदारी कामी येऊ शकते.

Jio Low Cost Laptop Launch At Rs 15000 With 4G Enabled SIM Reports

लीक रिपोर्ट्सनुसार या लॅपटॉपच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल असण्याची शक्यता आहे आणि डिवाइसमध्ये 2GB LPDDR4X रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज मिळू शकते. 4GB रॅम आणि 64GB eMMC 5.1 स्टोरेज असलेला एक हाय एन्ड व्हेरिएंट देखील ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. तसेच JioBook मध्ये व्हिडीओ आउटपुटसाठी एक मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, एक थ्री-अ‍ॅक्सिस एक्सेलेरोमीटर आणि एक क्वॉलकॉम ऑडियो चिप देखील मिळू शकते. हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट

स्वस्त जियो 5G फोन येतोय बाजारात

लॅपटॉपसह कंपनी नवीन स्वस्त 5G फोन देखील बाजारात लाँच करू शकते ज्याची किंमत 8 ते 12 हजारांच्या आत असू शकते. जियो फोन 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळे. हा फोन Snapdragon 480 प्रोसेसर, 4GB LPPDDR4X RAM आणि 32GB स्टोरेजसह बाजारात येईल. फोनच्या मागे 13MP + 2MP असा कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला 8MP चा सेन्सर असेल. Android 12 वर चालणाऱ्या Jio Phone True 5G मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here