Samsung Galaxy F54 5G भारतात लाँच, मिळेल 108MP Camera आणि 6,000mAh Battery

Highlights

 • ह्यात 8GB RAM + 256GB Memory आहे.
 • स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे.
 • ह्यात Exynos 1380 प्रोसेसर आहे.

Samsung Galaxy F54 5G फोन आज भारतात लाँच झाला आहे. ह्यातील 5जी बँड्स Jio आणि Airtel दोन्ही नेटवर्कवर सहज चालतात. शक्तिशाली बॅटरी आणि पावरफुल कॅमेरा असलेल्या हाय मोबाइलनं मिडबजेटमध्ये एंट्री घेतली आहे ज्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy F54 5G प्राइस व सेल

सॅमसंग गॅलेक्सी एफ54 5जी फोन भारतात 8जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्याची किंमत 29,999 रुपये आहे. Galaxy F54 5G फोन Meteor Blue आणि Stardust Silver कलरमध्ये फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी 2,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे त्यामुळे इफेक्टिव प्राइस 27,999 रुपये होईल.

Samsung Galaxy F54 5G फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

 • 6.7″ Super AMOLED+ Screen
 • Exynos 1380 Chipset
 • 108MP Rear Camera
 • 32MP Selfie Sensor
 • 25W 6,000mAh Battery
 • स्क्रीन : गॅलेक्सी एफ54 5जी मध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो सुपर अ‍ॅमोलेड+ पॅनलवर बनला आहे. ही पंच होल स्टाईल स्क्रीन आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
 • प्रोसेसर : Galaxy F54 5G सॅमसंगच्या ही 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या एक्सीनोस 1380 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5.1 वर चालतो.
 • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या सॅमसंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाइल एफ/1.8 अपर्चर असलेल्या 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करतो जो ओआयएस फीचरसह येतो. तसेच बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.
 • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy F54 5G फोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर वर चालतो.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एफ54 5जी मध्ये 6,000एमएएचची तगडी बॅटरी देण्यात आली आहे. ह्याची मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here