108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह लाँच झाला Infinix Note 30 5G फोन, किंमत फक्त 14,999 रुपये

Highlights

 • या फोनमध्ये 14 5G Bands आहे.
 • हा 30 मिनिटांत 75% चार्ज होतो.
 • ह्यात JBL सराउंड साउंड ड्युअल स्पिकर आहेत.

Infinix Note 30 5G अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीनं हा डिवाइस गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच केला होता. आता Infinix Note 30 5G ची भारतात एंट्री 8GB virtual RAM आणि MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह झाली आहे. पुढे तुम्ही इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

इनफिनिक्स नोट 30 5जी ची किंमत

Infinix Note 30 5G फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. तसेच बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 14,999 रुपये आहे. अशाप्रकारे मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि ह्याची किंमत 15,999 रुपये आहे. इनफिनिक्स नोट 30 5जी 22 जूनपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Interstellar Blue, Magic Black आणि Sunset Gold कलरमध्ये उपलब्ध होईल.

इनफिनिक्स नोट 30 5जी स्पेसिफिकेशन्स

 • 6.78″ FHD+ 120Hz Display
 • MediaTek Dimensity 6080
 • 16GB RAM (8GB+8GB RAM)
 • 108MP Triple Camera
 • 45W 5,000mAh Battery

 • स्क्रीन : Infinix Note 30 5G फोनमध्ये 6.78 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी+ रिजोल्यूशन आउटपुट देते. ह्या डिस्प्लेवर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. हा इनफिनिक्स मोबाइल आयकेयर मोडला देखील सपोर्ट करतो.
 • प्रोसेसर : इनफिनिक्स नोट 30 5जी फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. हा मोबाइल अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो एक्सओएस 13 चालतो.
 • मेमरी : इनफिनिक्सनं आपला फोन 8जीबी वचुर्अल रॅमसह सादर केला आहे जो 8जीबी फिजिकल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो. तसेच 4जीबी रॅम असलेल्या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी वचुर्अल रॅम मिळतो.
 • कॅमेरा : हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय टेक्नॉलॉजीवर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
 • बॅटरी : पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स नोट 30 5जी मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही 10000 पेक्षा जास्त वेळा चार्ज केली जाऊ शकते.
 • चार्जिंग : हा मोबाइल फोन 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो जी अर्ध्या तासात 1 ते 75 टक्के बॅटरी चार्ज करू शकते. त्याचबरोबर नोट 30 5जी मध्ये 10वॉट रिवर्स चार्जिंग देखील मिळते.
 • इतर फीचर : Infinix Note 30 5G फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन IP53 रेटेड आहे. तसेच ह्यात NFC आणि JBL stereo speakers सारखे फीचर्स मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here