Infinix नं आज भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन Infinix Note 12 Pro लाँच केला आहे. स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या इनफिनिक्सनं या सीरीजमध्ये आधीच Infinix Note 12, Note 12 Turbo, Note 12 5G आणि Note 12 Pro 5G सादर केले आहेत. तसेच आता पाचवा मोबाइल नोट 12 प्रो देखील 8GB RAM, Helio G99 SoC, 108MP Camera सारख्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतीय बाजारात आला आहे.
Infinix Note 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 12 Pro फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो Samsung ISOCELL sensor आहे. सोबतीला रियर कॅमेरा सेटअपमध्ये एक डेप्थ सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच
इनफिनिक्स नोट 11 प्रो 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट व 1000निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह हा इनफिनिक्स मोबाइल 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी57 जीपीयू आहे. विशेष हा भारतातील सर्वात पहिला हीलियो जी99 चिपसेट असलेला फोन आहे.
Infinix Note 12 Pro एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा इनफिनिक्स मोबाइल 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. हे देखील वाचा: कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच
Infinix Note 12 Pro ची किंमत
इनफिनिक्स नोट 12 प्रो एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस 16,999 रुपये आहे. Infinix Note 12 Pro येत्या 1 सप्टेंबरपासून भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन White, Blue आणि Grey कलरमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. फोनच्या खरेदीवर 1500 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 500 फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स दिले जात आहेत परिणामी Infinix Note 12 Pro ची किंमत 14,999 रुपये होईल.