108MP बॅक आणि 32MP फ्रंट कॅमेऱ्यासह येईल Tecno Spark 20 Pro 5G, किंमत असेल 14 हजाराच्या जवळपास!

Tecno Camon 30 Premier आणि Tecno Camon 30 5G फोन भारतात लाँचसाठी तयार आहे. या मोबाईलच्या मार्केटमध्ये येण्याच्या आधी कंपनी ‘स्पार्क’ सीरिजचा नवीन Tecno Spark 20 Pro 5G फोन पण समोर आला आहे. टिपस्टर पारस गुगलानीने आपल्या या फोनची फोटो इंटरनेटवर शेअर करत स्पार्क 20 प्रो 5 जी च्या स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. या अगामी टेक्नो फोनचे सर्व ​लीक माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Tecno Spark 20 Pro 5G स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.78-इंचाचा एलसीडी डिस्प्ले
  • मीडियाटेक डायमेंसिटी 6080
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 108 एमपी रिअर कॅमेरा
  • 32 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

स्क्रीन: समोर आलेल्या लीकनुसार Tecno Spark 20 Pro 5 जी फोन 1080 x 2460 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.78 इंचाच्या डिस्प्लेवर लाँच केला जाईल. ही फ्लॅट आयपीएस एलसीडी स्क्रीन असू शकते ज्यावर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.

प्रोसेसर: टेक्नो स्पार्क 20 प्रो 5जी फोनला MediaTek Dimensity 6080 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच केले जाऊ शकतो. ही 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मोबाईल चिपसेट आहे जी 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवते. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali-G57 GPU मिळू शकतो.

बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Tecno Spark 20 Pro 5G ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीकनुसार याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सल मेन सेन्सर दिला जाईल जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह मिळून काम करेल.

फ्रंट कॅमेरा: बॅक कॅमेरा प्रमाणे स्पार्क 20 प्रो चा फ्रंट कॅमेरा पण दमदार असेल. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की टेक्नो आपल्या या नवीन मोबाईलला 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह बाजारात आणेल जो एआय फिचरवर काम करेल.

मेमरी: लीकनुसार टेक्नो स्पार्क 20 प्रो 5 जी फोन भारतात 8 जीबी रॅमवर लाँच होईल. या मोबाईलमध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी पण दिली जाईल जो फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी रॅमची ताकद प्रदान करेल. तसेच फोनमध्ये 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज पण मिळेल.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी Tecno Spark 20 Pro 5G फोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच लीकमध्ये सांगण्यात आले आहे की ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाईल.

Tecno Spark 20 Pro 5G किंमत (लीक)

टेक्नो स्पार्क 20 प्रो 5 जी फोन पुढील महिन्यात जूनमध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. हा एक लोवर मिड बजेट स्मार्टफोन असेल. लीकमध्ये अंदाज लावला जात आहे की Tecno Spark 20 Pro ची किंमत 14,000 रुपये ते 16,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही मोबाईलच्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते. लीकनुसार हा फोन तीन रंगामध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here