Samsung Galaxy F55 5G किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती लीक, 50MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि 12GB रॅम

अलीकडेच Samsung ने Galaxy M55 5G मॉडेलला भारतात सादर केले होते. तसेच आता कंपनी Galaxy F55 ला लाँच करणार आहे. परंतु हा फोन पुढील महिन्यात लाँच केला जाणार आहे परंतु टिपस्टर अभिषेक यादवने या फोनची किंमत आणि माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी सांगितले आहे की स्पेसिफिकेशनच्या बाबतीत हा फोन Galaxy M55 च्या समान असेल. यात तुम्हाला 6.7 इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह 50MP चा OIS कॅमेरा मिळेल. पुढे आम्ही फोनबाबत संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.

Samsung Galaxy F55 किंमतीची माहिती

सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 5जी, 8GB+128GB – ₹26,999
सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 5 जी, 8GB+256GB – ₹29,999
सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 5 जी, 12GB+256GB – ₹32,999

Samsung Galaxy F55 5G ला कंपनीने तीन मेमरी व्हेरिएंटसह सादर केले आहे. याचे सुरुवाती मॉडेल 8GB रॅमसह 128GB च्या मेमरीमध्ये आहे आणि याची किंमत 26,999 रुपये आहे. तसेच दुसरे मॉडेल 8GB रॅम सोबतच आहे, परंतु यात तुम्हाला 256GB ची मेमरी मिळते, ज्याची किंमत 29,999 रुपये आहे. तसेच तिसरा आणि सर्वात मोठा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB मेमरीमध्ये आहे आणि कंपनीने याची किंमत 32,999 रुपये ठेवली आहे.

Samsung Galaxy M55 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले:
Samsung Galaxy M55 5G ला कंपनी 6.7 इंचाच्या स्क्रीनसह लाँच करू शकते. फोनमध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच यात 1,000 निट्स पीक ब्राईटनेस तसेच 120 हर्ट्झ चा रिफ्रेश रेट मिळू शकतो.

प्रासेसर: हा फोन क्वॉलकॉम Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरवर येऊ शकतो. मिड सेगमेंटचा हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार आहे आणि यामध्ये 2.5 GHz पर्यंतचे क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर मिळतो.

कॅमेरा: सॅमसंगचा हा फोन दमदार स्पेसिफिकेशनसह येणार आहे. माहितीनुसार फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल आणि याचा मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. तसेच मेन कॅमेऱ्यासह OIS ला सपोर्ट पण दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाईड आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा असण्याची संभावना आहे.

सेल्फीसाठी यात 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी: सॅमसंग गॅलेक्सी एफ55 5 जी मध्ये तुम्हाला 5,000mAh ची बॅटरी पाहायला मिळू शकते. तसेच यावेळी 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोट मिळू शकतो.

कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटी पाहता यात USB 2.0 पोर्ट सह WiFi 6, ब्लूटूथ व्हर्जन 5.2 आणि एनएफसीला सपोर्ट मिळेल. तसेच कंपनीने ड्युअल स्टिरियो स्पिकरसह सादर करू शकते. तसेच हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सह येऊ शकतो.

वॉटरप्रूफ: चांगली ही असू शकते की सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 मध्ये तुम्हाला IP67 रेटिंग पाहायला मिळू शकते जो न फक्त धूळ नाहीतर पाण्यापासून फोनला सुरक्षित ठेवण्याचा विश्वास देते.

आकार व वजन: Samsung Galaxy M55 5G फक्त 7.8mm मोठा असू शकतो. तसेच माहितीनुसार याचे वजन 180 ग्रॅम पर्यंत असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here