Oppo Reno 12 आणि 12 Pro मोबाईल जागतिक स्तरावर झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ओप्पोने गेल्या महिन्यात रेनो 12 सीरीजचा होम मार्केट चीनमध्ये सादर केला होता. तसेच, आता यात येत्या OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro स्मार्टफोन जागतिक स्तरावर युरोपमध्ये लाँच झाले आहेत. दोन्ही मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 7300 एनर्जी प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले सारखे अनेक फिचर्स आहेत. चला, पुढे फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.

Oppo Reno 12 Pro चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: ओप्पो रेनो 12 प्रो मध्ये 6.7 इंचाचा FHD+ कर्व्ड OLED डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2412 × 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 1200 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस मिळते. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 च्या सुरक्षेसह आहे.
  • चिपसेट: हा MediaTek Dimensity 7300 एनर्जी 4nm प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.
  • स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 12GB LPDDR4X रॅम आणि 512GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज आहे. ज्याला मायक्रोएसडीच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
  • कॅमेरा: फोनच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 1/1.95″ Sony LYT-600 सेन्सर, f/1.8 अपर्चर आणि OIS असलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा, Sony IMX355 सेन्सर आणि ƒ/2.2 अपर्चर असलेला 8MP 112º अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि Samsung JN5 सेन्सर असलेला 50MP 2x टेलीफोटो कॅमेरा मिळतो. हा 20x पर्यंत डिजिटल झूम देतो. तसेच, सेल्फीसाठी Samsung JN5 सेन्सर, f/2.0 अपर्चरसह 50MP ची लेन्स आहे. तसेच AI टेक्नॉलॉजीची सुविधा पण आहे.
  • बॅटरी: फोनला चालविण्यासाठी मोबाईलमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 80 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
  • इतर: इतर फिचर्स पाहता डिव्हाईसमध्ये ड्युअल सिम 5 जी, 4 जी, IP65 रेटिंग, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फिचर आणि स्टीरियो स्पिकर सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
  • वजन आणि डायमेंशन: Oppo Reno 12 Pro चे वजन आणि डायमेंशन पाहता हा 161.4 × 74.8 × 7.40 एमएम आणि 180 ग्रॅमचा आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम: Oppo Reno 12 Pro स्मार्टफोन Android 14 आधारित ColorOS 14.1 सह मिळून चालतो.

Oppo Reno 12 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Oppo Reno 12 मध्ये 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे. यावर 2412 × 1080 पिक्सल रिजॉल्यूशन,120Hz रिफ्रेश रेट, 1200 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
  • प्रोसेसर: रेनो 12 पण ऑक्टाकोर MediaTek Dimensity 7300 एनर्जी 4nm प्रोसेसर आणि माली-G615 MC2 GPU सह येतो.
  • स्टोरेज: या मोबाईलमध्ये 12GB LPDDR4X RAM +256GB इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे.
  • कॅमेरा: Reno12 मध्ये रिअर पॅनलवर 50MP चा 1/1.95″ Sony LYT-600 सेन्सर, f/1.8 अपर्चर OIS, 8MP 112º अल्ट्रा-वाईड Sony IMX355 सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा GC32E2 सेन्सर आहे.
  • बॅटरी: सामान्य मॉडेल रेनो 12 मध्ये पण 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 80 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग आहे.
  • इतर: हा ड्युअल सिम 5 जी, 4 जी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, इंफ्रारेड सेन्सर, USB टाईप-C ऑडियो, स्टीरियो स्पिकर, IP65 रेटिंगसह आहे.
  • वजन आणि डायमेंशन: Oppo Reno12 चे डायमेंशन 161.4x 74.1×7.57mm आणि वजन 177 ग्रॅम आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम: Oppo Reno 12 स्मार्टफोन पण Android 14 आधारित ColorOS 14.1 वर आधारित आहे.

OPPO Reno 12 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

  • OPPO Reno 12 च्या 12GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत 499 यूरो म्हणजे जवळपास 44,660 रुपये आहे.
    मोबाईलसाठी युजर्सना एस्ट्रो सिल्व्हर आणि मॅट ब्राऊन सारखे दोन कलर मिळतील.
  • Oppo Reno 12 Pro मॉडेलच्या 12GB रॅम + 512GB मेमरी व्हेरिएंटची किंमत 599 यूरो म्हणजे जवळपास 52,700 रुपये आहे.
  • प्रो फोनसाठी ग्राहकांना नेबुला सिल्व्हर आणि स्पेस ब्राऊन सारखे दोन कलर सादर करण्यात आले आहेत. दोन्ही मॉडेल या महिन्यात युरोप आणि यूके मध्ये उपलब्ध होतील.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here