बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Motorola तयार; सगळ्यांना देणार टक्कर

Motorola नं आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto G32 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या युरोपमध्ये लाँच करण्यात आहे. Moto G32 स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो. Moto G32 स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला आहे. बजेट सेगमेंटमध्ये रेडमी, रियलमीसह टेक्नो आणि इनफिनिक्स ब्रँड्सकडून मोटोरोलाच्या या हँडसेटला टक्कर मिळू शकते.

Moto G32 चे स्पेसिफिकेशन्स

Moto G32 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. Moto G32 स्मार्टफोन Snapdragon 680 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबतीला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे ज्याच्या मदतीनं स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हे देखील वाचा: छोटा पॅकेट बडा धमाका! 16GB रॅमसह दणकट ASUS Zenfone 9 लाँच; वनप्लस-शाओमीच्या अडचणी वाढल्या

मोटोरोलाच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन Android 12 आधारित कस्टम युआयवर चालतो.

या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 30W TurboCharge टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. तसेच फेस रिकॉग्नाइजेशन सपोर्टही आहे. या फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर आणि दोन मायक्रोफोन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth v5.2, GPS, A-GPS, GLONASS, NFC, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट मिळतो. हे देखील वाचा: 0 हजारांच्या आत स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह दमदार मोबाईलची एंट्री

Moto G32 ची किंमत

Moto G32 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह येतात. मोटोरोलाचा हा फोन 210 यूरो (सुमारे 16,600 रुपये) च्या प्रारंभिक किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच लॅटिन अमेरिका आणि भारतात देखील लाँच केला जाईल. Moto G32 स्मार्टफोन मिनरल ग्रे, स्टेन सिल्व्हर आणि रोज गोल्ड या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here