Tata Tiago EV On EMI: भारतातील इलेक्ट्रिक कार्सची वाढती मागणी पाहून टाटा मोटर्सनं (Tata Motors) काही दिवसांपूर्वी टियागो ईव्ही (Tiago EV) लाँच केली आहे. ही टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्यामुळे हिला सामन्यांची इलेक्ट्रिक कार असं देखील म्हटलं जात आहे. कंपनीनं या कारचे 4 मॉडेल सादर केले आहेत, ज्यात XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux चा समावेश आहे. Tiago EV की किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. हिची बुकिंग 21 हजार रुपये देऊन करता येते. परंतु जर तुम्ही ही कार हप्त्यांवर घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला माहित आहे का किती ईएमआय आणि डाउन पेमेंट द्यावं लागेल? पुढे आम्ही Tiago EV संबंधित सर्व फायनान्स ऑप्शनची माहिती दिली आहे.
Tata Tiago EV Down Payment and EMI
Tata Tiago EV ची बुकिंग किंवा खरेदी करायची असल्याच या इलेक्ट्रिक कारची ऑन रोड प्राइस (दिल्ली) 8.49 लाख रुपयांपासून 11.79 लाख दम्यान आहे. ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्स पैकी एक आहे. कार देखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर टाटा टियागो ईवीसाठीसाठी 7.96 लाख रुपयांचे लोन 60 महीने म्हणजे 5 वर्षसाठी 9.8 टक्के व्याजदरात घेतलं तर तुम्हाला प्रति माह 16,848 रुपयांचा EMI द्यावा लागेल. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोनच्या यादीत OPPO A58 5G ची एंट्री; वॉटरप्रूफ बॉडीसह 50MP Camera आणि 13GB RAM
- Tata Tiago EV XE Base व्हेरिएंटसाठी 88,466 रुपये डाउन पेमेंट केल्यास, 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने तुमचा मासिक ईएमआय म्हणून 16,848 रुपयांचे पेमेंट करावे लागेल.
- Tata Tiago EV XT व्हेरिएंटसाठी 1.04 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास, 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने दरमहिन्याला ईएमआय म्हणून 19,790 रुपये द्यावे लागतील.
- Tata Tiago EV XT Base व्हेरिएंटसाठी 94,670 हजार रुपयांच्या डाउन पेमेंट नंतर 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजाने दर महिन्याला 18,012 रुपयांचा हप्ता बसेल.
- Tata Tiago EV XZ Plus व्हेरिएंटसाठी 1.13 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास 5 वर्षांसाठी 9.8 टक्के दराने महिन्याला 21,577 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
- Tata Tiago EV XZ Plus Fast Charge व्हेरिएंटसाठी 1.19 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास 5 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने तुम्हाला 22,555 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.
(नोटः जर तुम्ही 7,96,663 रुपये लोन स्वरूपात घेतल्यास 5 वर्षांसाठी 9.8 टक्के दराने एकूण 10,10,880 रुपये द्यावे लागतील म्हणजे 2,14,217 रुपयांचं व्याज द्यावं लागेल. ही माहिती EMI Calculator नुसार आहे, अधिक माहितीसाठी टाटा मोटर्सच्या नजीकच्या डीलरशिप संपर्क करा.)
Tiago EV Price
Tiago EV
Tata Tiago EV ची डिजाइन पूर्णपणे Tata Tiago च्या पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. परंतु टाटाच्या सिग्नेचर ट्राय-एरो पॅटर्न डिजाइनसह एक फ्रेश लुक यात मिळेल. Tiago EV मध्ये ब्लॅक कॉन्ट्रास्ट रूफ, ब्लॅक आउट ORVMs, दरवाज्याचे हँडल आणि रियर स्पॉइलर एलिमेंट आहेत जो हिला स्पोर्टी लुक देखील देतो. हे देखील वाचा: Kantara सारखे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे ‘हे’ आहेत 5 दाक्षिणात्य चित्रपट; OTT प्लॅटफॉर्म्सवर करता येतील स्ट्रीम
टाटा टियागो ईव्ही टाटाची जिपट्रॉन टेक्नॉलॉजीसह येते आणि यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतात. छोटा बॅटरी पॅक 19.4kWh चा आहे तर मोठा बॅटरी पॅक 24kWh चा आहे. तसेच 19.4kWh बॅटरी पॅक असलेल्या Tata Tiago EV मध्ये 250km ची रेंज अपेक्षित आहे. तर MIDC नुसार मोठी बॅटरीमधून 315km ची रेंज मिळेल. Tiago EV पॉवरट्रेन (बॅटरी आणि मोटर) IP67 सर्टिफाइड आहेत.
टाटा नुसार फक्त 5.7 सेकंदात ही कार ताशी 60 किमीचा वेग पकडू शकते. Tiago EV मध्ये 15A घरगुती सॉकेट, एक 3.3kW AC होम चार्जर, एक 7.2kWh एसी होम चार्जर आणि एक DC फास्ट चार्जर असे चार चार्जिंग ऑप्शन मिळतात. यातील 7.2kW चा फास्ट चार्जर Tiago EV फक्त 3 तास 36 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल. तर DC चार्जर फक्त 57 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग देईल.
टाटा टियागो ईव्ही मल्टी-लेव्हल रीजनरेटिव ब्रेकिंग, क्रूज कंट्रोल आणि स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये व्हाइट लेदरेट सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन-सेंसिंग वाइपर, ऑटो हेडलॅम्प, पावर विंडो, कूल्ड ग्लव बॉक्स, पुश बटन स्टार्ट स्टॉप, रियर वॉश वाइप्स आणि डिफॉगर, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर सारखे प्रीमियम फीचर्सचा देखील समावेश आहे. तसेच यात हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह एक हरमन सोर्स टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि 8 स्पिकर सिस्टम मिळते.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.