गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात

Samsung Galaxy F23

Samsung Galaxy A14 5G ची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती की हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आता या सीरीजमधील Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 दिसला आहे जिथे गॅलेक्सी फोन अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. आशा आहे की Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A14 4G लवकरच टेक मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A14 4G

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोन गीकबेंचवर Samsung SM-A145P मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग कालची म्हणजे 31 ऑक्टोबरची आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. गीकबेंचच्या माध्यमातून समजलं आहे की Samsung Galaxy A14 4G फोन सर्वात नवीन आणि लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो तसेच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेटवर चालू शकतो. हे देखील वाचा: 31 दिवसांचे बेस्ट Plan, जास्त डेटासह कॉलिंग अगदी मोफत

Samsung Galaxy A14 4G फोन गीकबेंचवर 4 जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे, म्हणजे हा फोन 4जीबी रॅमवरच लाँच होऊ शकतो. परंतु एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. या सॅमसंग फोनमध्ये ग्राफिक्ससाठी माली जी-52 जीपीयू दिला जाऊ शकतो. बेंचमार्क स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी ला सिंगल-कोर मध्ये 1668 आणि मल्टी-कोर मध्ये 5284 स्कोर मिळाला आहे.

Samsung Galaxy A14 5G

गॅलेक्सी ए14 5जी मॉडेल पाहता समोर आलेल्या लीक्सनुसार या मोबाइल फोनची किंमत 15,000 ते 18,000 रुपयांदरम्यान असू शकते. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो. फोनमधील चिपसेटची माहिती मिळाली नाही. हे देखील वाचा: एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन 6 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह दिली जाऊ शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here