स्वदेशी मोबाइल निर्माता कंपनी लावानं काही दिवसांपूर्वी संपूर्ण टेक विश्वाचं लक्ष वेधून घेईल अशी कामगिरी केली आहे. कंपनीनं देशातील सर्वात स्वस्त 5G फोन Lava Blaze 5G भारतात लाँच केला आहे. आता या स्मार्टफोनची विक्री उद्यापासून म्हणजे 15 नोव्हेंबर 2022 पासून अॅमेझॉनवरून सुरु केली जाईल. हा भारतातील पहिला 5G स्मार्टफोन आहे, जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. परंतु ही किंमत मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. पुढे आम्ही तुम्हाला Lava Blaze 5G स्मार्टफोनच्या सेल डेट, मिळणाऱ्या स्पेशल ऑफर आणि स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती दिली आहे.
Lava Blaze 5G सेल आणि किंमत
Lava Blaze 5G स्मार्टफोन अॅमेझॉनवर उद्या म्हणजे 15 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. Lava Blaze 5G स्मार्टफोन कंपनीनं भारतात 10,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. परंतु लाँच ऑफर अंतगर्त या स्मार्टफोनवर कंपनी स्पेशल डिस्काउंट देत आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. ऑफर अंतर्गत लावाचा नवा 5G स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: वापरलेल्या स्मार्टफोनला देखील इथे मिळेल जबरदस्त किंमत, घरबसल्या करा सौदा
Lava Blaze 5G स्पेसिफिकेशन्स
लावा ब्लेज 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600) डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. Lava Blaze 5G च्या डिस्प्लेला Widevine L1 ला सपोर्ट मिळाला आहे ज्यामुळे ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट मिळतो.
Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा लावा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. कंपनीनं यात 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. फोन 5G च्या 8 बँड्सना सपोर्ट करतो, ज्यात n77 आणि n78 बँड पण शामिल आहेत.
लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे याला 7जीबी रॅमची पावर मिळते. फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी 1टीबी पर्यंत वाढवता येते. लावाचा हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू अशा दोन कलर्समध्ये लाँच करण्यात आहे.
फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला आणखी दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: सर्वांपेक्षा जबरदस्त BSNL चा ‘हा’ स्वस्त प्लॅन! 3300GB डेटा सह मिळेल फ्री कॉलिंग
सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वायफाय, 3.5mm ऑडिओ जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.