108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत

Highlights

  • Realme C53 भारतात रियलमी पॅड 2 सह लाँच झाला आहे.
  • फोन अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • Realme C53 फक्त 7.99 मिमी जाड आहे.

Realme नं आपल्या बजेट फ्रेंडली सी सीरिजचा विस्तार केला आहे. Realme C53 आज भारतात लाँच झळा आहे. तसेच जोडीला Realme Pad 2 ची एंट्री देखील झाली आहे. ह्या लेखात आपण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लाँच झालेल्या Realme C53 ची माहिती घेणार आहोत. ज्यात 5000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 12GB RAM असे दमदार फीचर्स मिळतात.

Realme C53 ची किंमत

रियलमी सी53 च्या 4जीबी + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 6जीबी + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री 26 जुलैपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्वर केली जाईल. हा फोन Champion Gold आणि Champion Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme C53 चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोन 6.74इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 560 निट्झ ब्राइटनेस आणि 16.7 मिलान कलर्सला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : ह्या रियलमी फोनमध्ये UNISOC T612 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो.
  • रॅम : Realme C53 6 जीबी पर्यंत रॅमसह लाँच झाला आहे. ह्या फोनमध्ये 128जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. 6GB डायनॅमिक रॅमच्या मदतीनं एकूण 12GB RAM ची ताकद मिळवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलची लेन्स आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • अन्य फीचर्स : Realme C53 मध्ये ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससह सारखे फीचर्स मिळतात. हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. ह्या फोनची थिकनेस फक्त 7.99एमएम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here