Jio Cinema वर गेलेल्या प्रेक्षकांना वळवण्याचा प्रयत्न; Disney+ Hotstar मोफत दाखवणार आशिया कप आणि आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप

Highlights

 

  • Disney+ Hotstar वर मोफत दोन मोठ्या स्पर्धा बघता येणार.
  • जियो सिनेमाला टक्कर देण्याची योजना
  • आयपीएल 2023 मोफत दाखवून जियो सिनेमाला मिळालेलं रेकॉर्ड तोड व्यूज

 

 

Disney+ Hotstar नं इंडियन क्रिकेट फॅन्सना धमाकेदार भेट दिला आहे. आगामी क्रिकेट टूर्नामेंट – आशिया कप आणि आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या मॅचेस युजर्स मोबाइलवर मोफत बघू शकतील. हॉटस्टारनं हे पाऊल Jio Cinema ला टक्कर देण्यासाठी उचललं आहे, ज्यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मोफत दाखवली होती. जियो सिनेमाला आयपीएलमधून विक्रमी 44.9 कोटी व्यूज मिळेल होते.

युजर्स एक्सपीरियंस सुधारण्यावर लक्ष

एक्सचेंज4 मीडियाशी बोलताना डिज्नी प्लस हॉटस्टारचे प्रमुख सजीत शिवनंदन यांनी सांगितलं की भारतात वेगानं विकसित होणाऱ्या ओटीटी इंडस्ट्रीमध्ये हॉटस्टार अग्रस्थानी आहे. युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही नवनवीन प्रोजक्टवर काम करत आहोत. आशिया कप आणि आयसीसी क्रिकेट वर्ड कप आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. ह्या स्पर्धा मोफत दाखवल्याने जास्त मोबाइल युजर्स पर्यंत पोहोचता येईल.

आयपीएलमध्ये जियो सिनेमाचा विक्रम

JioCinema कडे IPL 2023 चे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स होते. जियोनं सर्व युजर्ससाठी ही टूर्नामेंट मोफत उपलब्ध केली होती. IPL च्या अंतिम सामन्यात जियो सिनेमावर एकावेळी 3.2 कोटी युजर्स होते, जो एक विक्रम आहे. ह्यापूर्वी साल 2019 मध्ये डिज्नी प्लस हॉट स्टारवर आयपीएल दरम्यान सुमारे 2.5 कोटी युजर्स एकावेळी मॅच बघत होते.

डिज्नी प्लस हॉटस्टारच्या युजरबेसमध्ये घट

रॉयटर्सच्या एक रिपोर्टमध्ये सीएलएसएच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे की जियोनं मोफत आयपीएल दाखवल्यामुळे डिज्नी प्लस हॉटस्टारच्या ग्राहकांची संख्या जवळपास 50 लाखांनी घेतली आहे. त्यामुळे कमी होत असलेला युजरबेस पुन्हा वाढवण्यासाठी हॉटस्टार भारतात युजर्सना मोफत आशिया कप आणि आयसीसी वर्ल्ड कप ऑफर करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here