रियलमी ने गेल्या महिन्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 2 लॉन्च केला होता. 4 सप्टेंबरला रियलमी 2 पहिल्या फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता आणि पहिल्याच सेल मध्ये फोन चे 2 लाख यूनिट विकले गेले होते. कंपनी चे म्हणेन आहे की दोन फ्लॅश सेल मध्ये रियलमी 2 चे 3,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत. तसेच आता रियलमी ने कंपनी च्या अजून एका नव्या डिवाईसची घोषणा केली आहे. येत्या 27 सप्टेंबरला रियलमी 2 प्रो इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्यात येईल.
रियलमी इंडिया ने आपल्या आगामी ईवेंट साठी मीडिया इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनी ने सांगितले आहे की येत्या 26 आणि 27 सप्टेंबरला रियलमी एक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे आणि याच मंचावरून कंपनी चा नवीन स्मार्टफोन सादर केला जाईल. जरी रियलमी ने या दोन दिवसीय ईवेंट मध्ये लॉन्च होणार्या प्रोडक्टचे नाव सांगितले नसले तरी शेयर केलेल्या मीडिया इन्वाईट वरून स्पष्ट झाले आहे की हा नवीन फोन रियलमी 2 प्रो असेल.
रियलमी 2 प्रो बद्दल कंपनी चे सीईओ माधव सेठी ने 91मोबाईल्सला सांगितले आहे की रियलमी 2 प्रो कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करेल. आशा आहे की रियलमी 2 प्रो मध्ये 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600 सीरीज मधील चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन पण बेजल लेस नॉच डिस्प्ले वाला असेल आणि डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
रियलमी 2 किंमत पाहता देशात हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. रियलमी 2 देशात शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध आहे. रियलमी 2 चे फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा).















