PUBG च्या वेडापायी सोडले खाणे पिणे, 16 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू

PUBG भारतात सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. काही लोक हा चीनी ऍप असल्यामुळे बंद करू इच्छित आहेत तर अनेकांना वाटते कि या मोबाईल गेममुळे देशातील तरुण वाया जात आहे आणि त्यामुळे पबजी वर बॅनची मागणी करत आहेत. सरकारने अजूनतरी PUBG वर बॅनचा कोणताही निर्णय घेतला नाही पण या दरम्यान धक्कादायक बातमी समोर आली आहे कि या ऑनलाईन मोबाईल गेमचे वेड आता एका 16 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूचे कारण बनले आहे.

अशी बातमी येत आहे कि PUBG मोबाईल गेममुळे देशातील अजून एकाचा मृत्यु झाला आहे. यावेळी पबजीची शिकार एक 16 वर्षीय किशोर झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार आंध्रप्रदेश मधील एक 16 वर्षीय मुलगा ऑनलाईन खेळता येणाऱ्या PlayerUnknown Battlegrounds मोबाईल गेम म्हणजे पबजीच्या वेडाचा शिकार झाला आणि सतत गेम खेळण्यात व्यस्त राहू लागला. या गेमचे वेड त्याला इतके लागले कि तो दिवसभर गेम खेळू लागला.

रिपोर्टनुसार PUBG खेळण्यात व्यस्त राहणाऱ्या या मुलाला मोबाईल गेम समोर खाणे पिणे पण व्यर्थ वाटू लागले आणि त्याने जेवण टाकले. असे अनेक दिवस सुरु होते आणि रिपोर्टनुसार हा मुलगा गेमच्या नादात पाणी पण पित नव्हता. सतत पबजी मध्ये असल्यामुळे आणि खाणे व पिणे सोडल्यामुळे 16 वर्षीय मुलाला डिहायड्रेशन झाले आहे आणि तो आजारी पडला. तेव्हा त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि तिथे उपचारादरम्यान शारीरिक कमजोरीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

16 वर्षीय मुलाच्या मृत्यूस PUBG चे वेड कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर आता सायबर क्राइमच्या एसपी जी.आर. राधिका यांनी विधान केले आहे कि त्या आणि त्यांची टीम विध्यार्थी, पालकांसोबत जागरूकता पसरवण्याचा कार्यक्रम सुरु करतील ज्यात फक्त PUBG नाही तर इतर अनेक गोष्टी आणि सायबर क्राईम संबंधित लोकांना माहिती दिली जाईल.

विशेष म्हणजे PUBG मुळे जीव गेल्याची हि पहिली वेळ नाही. असे अनेक प्रकार आतापर्यंत भारतात समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी 31 वर्षीय दलीप राजची हत्या त्याच्या काही मित्रांनी केली होती. बातमी नुसार मृत व्यक्ती आपल्या काही मित्रांसोबत ऑनलाइन गेम पबजी खेळत होता आणि तेव्हा एका गोष्टींवरून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दलीप राजची हत्या झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here