हा प्लॅन पाहून सिम पोर्ट करण्याची होईल इच्छा! 160 दिवसांची वैधता आणि 2GB डेली डेटा असलेला प्लॅन

BSNL 2GB Daily Data: सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम (बीएसएनएल) गेले कित्येक दिवस आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करत आहे. या Recharge Plan ची खासियत म्हणजे यात Reliance Jio आणि Airtel पेक्षा शानदार बेनिफिट्स मिळतात. आता कंपनीनं Diwali 2022 च्या निमित्ताने नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. कंपनीनं या प्लॅनची माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. बीएसएनएलचा हा नवीन नवीन प्लॅन दीर्घ वैधतेसह Daily 2GB Data देतो.

997 रुपयांचा आहे प्लॅन

BSNL Rajasthan नं आपल्या Twitter अकाऊंटवरून PV997 Plan ची माहिती दिली आहे. ट्विटरवर शेयर करण्यात आलेल्या माहितीनुसार प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि मोठी वैधता मिळत आहे. या प्लॅनची अधिक माहिती कंपनीच्या साइटवर मिळू शकते. प्लॅन सध्या राजस्थान सर्कलसाठी वैध आहे. परंतु, तुम्ही कस्टमर केयरवर कॉल करून तुमच्या राज्यातील प्लॅनच्या उपलब्धतेची माहिती मिळवू शकता. पुढे आम्ही तुम्हाला इस प्लॅनबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. हे देखील वाचा: घर बसल्या मिळेल Airtel 5G सिम, फक्त करावं लागेल छोटंसं काम

220 जीबी मिळेल डेटा

या प्लॅनची खासियत म्हणजे रिचार्जमध्ये डेली 2GB डेटा मिळतो. तसेच प्लॅनची वैधता 160 दिवस आहे त्यानुसार युजर्सना एकूण 220 जीबी डेटा मिळेल. इतकेच नव्हे तर Prepaid Users साठी सादर करण्यात आलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अगदी मोफत दिली जात आहे आणि डेली 100 SMS देखील मोफत पाठवता येतील. साधारणपणे या प्राइस रेंजमध्ये अन्य प्रायव्हेट कंपन्या 84 दिवस वैधता असलेले प्लॅन सादर करतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला रोजचा खर्च जवळपास 5.5 रुपयांच्या आसपास असेल.

BSNL 5G पुढील वर्षी होईल लाँच

सराकरनं घोषणा केली आहे की पुढील वर्षी 15 ऑगस्टला BSNL 5G लाँच होईल. तसेच BSNL 4G साठी देखील जास्त वाट पाहावी लागणार नाही. बीएसएनएल आणि टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेज (TCS) सोबत मिळून 4जी सेवा सादर करेल. पहिल्यांदाच 4जी सेवेसाठी भारतीय टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. अशी माहिती BSNL चे डायरेक्टर Sushil Kumar Mishra यांनी दिली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की अलीकडेच केंद्र सरकारनं टेलीकॉम सेक्टरमध्ये 100 टक्के FDI ला मंजूरी दिली होती. हे देखील वाचा: Ola S1 Pro vs Vida V1 Pro: हिरो की ओला? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटीमध्ये आहे जास्त दम

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here