घर बसल्या मिळावा Airtel 5G सिम, काही स्टेप्समध्ये काम फत्ते

भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या एयरटेल आणि जियोनं देशात आपाआपली 5G सेवा सुरु केली आहे. भारतात 5G सर्व्हिस लाइव्ह करणारी एयरटेलही पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. कंपनीनं 1 ऑक्टोबरला 5G देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली होती. विशेष म्हणजे आता एयरटेलनं एक एक करून आणखी नव्या शहरांना आपली वेगवान 5G सेवे देण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनवर एयरटेलची 5G सेवा वापरू इच्छित असाल तर पुढे आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिली आहे.

Airtel 5G कसं वापरायचं

Airtel 5G वापरण्यासाठी सर्वप्रथम 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. एयरटेल युजर्सच्या परिसरात 5G सेवा उपलब्ध होताच SMS च्या माध्यमातून सूचना मिळेल. तसेच एयरटेल युजर्स Airtel Thanks अ‍ॅपच्या माध्यमातून देखील 5G नेटवर्क उपलब्धतेची माहिती मिळवू शकतात. 4G फोनवर 5G सेवा वापरता येणार नाही. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

Airtel 5G साठी नवीन सिम आवश्यक आहे का?

एयरटेलच्या मते 5G वापरण्यासाठी युजर्सना वेगळं सिम घेण्याची गरज नाही. एयरटेल युजर्स 4G सिमवरच 5G नेटवर्कचा अनुभव घेऊ शकतील परंतु यासाठी युजर्सकडे अपडेटेड 4G सिम असणं आवश्यक आहे. जर एयरटेल युजर्सकडे जुनं 3G सिम असेल तर युजर्स 5G नेटवर्क वापरू शकणार नाहीत. जर तुमच्याकडे एयरटेलचं अपडेटेड 4G सिम नसेल तर तुम्ही घर बसल्या सिम मागवू शकता.

5G सिम कसं मागवायचं

Airtel आपल्या युजर्सना 5G सिम फ्री होम डिलिव्हरी करत आहे. एयरटेलच्या सिमची फ्री होम डिलिव्हरी सध्या काहीच शहरांमध्ये उपलब्ध आहे. पुढे आम्ही तुम्हाला 5G सिमच्या होम डिलिव्हरीची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे.

Airtel नवीन सिमसाठी तुम्हाला एयरटेलच्या ऑफिशियल वेबसाइट https://www.airtel.in किंवा एयरटेल थँक्स अ‍ॅप वर लॉगइन करावं लागेल.

इथे तुम्हाला न्यू प्रीपेड सिमवर क्लिक करायचं आहे. आवश्यक माहिती आणि पत्ता द्या. तुमची सेल्फी केवायसी पूर्ण झाल्यावर सिमची होम डिलिव्हरी केली जाईल. फक्त सिमच्या होम डिलिव्हरी दरम्यान तुम्हाला तुमचा आयडी एयरटेलच्या डिलिव्हरी एजंटला दाखवावा लागेल.

Airtel 5G फोनमध्ये असं करा अ‍ॅक्टिव्हेट?

Airtel 5G सर्व्हिस वापरण्यासाठी एयरटेल ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनच्या सेटिंग मध्ये बदल करावा लागेल. तुमच्या एरियामध्ये एयरटेल 5G सर्व्हिस सुरु झाल्यावर फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन 5G इनेबल करावं लागेल. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला Airtel चा 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन; स्वस्तात डेटा, एसएमएस आणि कॉलिंगही

सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये सेटिंग मेन्यूवर जा. त्यानंतर कनेक्शन ऑप्शनची निवड करा. मग मोबाइल नेटवर्क ऑप्शनवर क्लिक करा.

मोबाइल नेटवर्कवर क्लिक केल्यावर तुम्हाला फोनमध्ये सिम सिलेक्ट करावं लागेल. इथे तुम्हाला 5G नेटवर्कचा ऑप्शन दिसेल, त्याची निवड करा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here