200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

 • फोनमध्ये 32MP Selfie मिळतो.
 • ह्याचा फिंगरप्रिंट सेन्सर स्क्रीनच्या खाली लपला आहे.
 • हा 100W Fast Charging ला सपोर्ट करतो.

रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

200MP Camera असलेला फोन

Realme 11 Pro+ 5G चा कॅमेरा ह्या फोनची सर्वात मोठी खूबी आहे. ह्या मोबाइलमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जी Samsung HP3 super zoom लेन्स आहे. हा 1/1.4″ एक्स्ट्रा लार्ज सेन्सर आहे जो 2.24μm फ्यूजन लार्ज पिक्सल सोबतच 22.9एमएम फोकल लेंथ तसेच 85° फिल्ड व्यू (FOV) देतो. हा सॅमसंग सेन्सर एफ/1.69 अपर्चरवर चालतो.

तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 11 प्रो+ 5जी फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी 11 प्रो+ 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

 • 6.7″ FHD+ AMOLED Display
 • 8GB RAM Expansion
 • MediaTek Dimensity 7050
 • 5,000mAh Battery
 • 100W Flash Charging
 • स्क्रीन : रियलमी 11 प्रो+ 5जी फोन फोनमध्ये 1080 x 2412 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. ह्या फोन डिस्प्लेमध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2160हर्ट्झ पीडब्ल्यू डिमिंग, 1260हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 100% डीसीआई-पी3 कलर गामुट आणि आय केयर सारखे फीचर्स मिळतात.

 • प्रोसेसर : हा रियलमी मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 सह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
 • रॅम : Realme 11 Pro+ 5G 8जीबी डायनॉमिक रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. ही टेक्नॉलॉजी इंटरनल फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा 8जीबी जोडून पावर वाढवते.

 • बॅटरी : Realme 11 Pro+ 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
 • फास्ट चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोन चार्ज करते.
 • कनेक्टिव्हिटी : हा रियलमी मोबाइल ड्युअल मोड SA/NSA 5Gला सपोर्ट सपोर्ट करतो ज्यावर 7 5जी बँड्स वापरता येतात. ह्यात 4जी एलटीई पण आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, ब्लूटथ आणि वायफाय सोबतच एनएफसी सारखे फीचर्स मिळतात. रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here