मोफत वाटण्यात आले 2000 Apple iPhone, जाणून घ्या नेमके काय घडले

Apple iPhone बद्दल एक विनोद प्रसिद्ध आहे कि, ‘जर आयफोन घ्यायचा असेल तर किडनी विकावी लागेल’. आजही अनेकजण आयफोनला स्टाईल आणि स्टेटस म्हणून पाहतात आणि ऍप्पलने नवीन आयफोन लॉन्च केल्यावर तो घेण्याचा विचार करतात. सर्वांनाच माहिती आहे कि iPhone किती महाग असतात आणि याच कारणामुळे हा महागडा फोन एंडरॉयड स्मार्टफोन्सच्या तुलनेत कमी विकला जातो. पण जरा विचार करा कोणी तुमच्याकडून एक रूपया पण ना घेता iPhone दिला आणि तेही अगदी मोफत तर कसे वाटेल? अशीच एक घटना समोर आली आहे जिथे एक किंवा दोन नाही तर 2,000 iPhone वाटण्यात आले आहेत. पण हैराण करणारी बाब हि नाही कि Apple iPhone लोकांना मोफत मिळाले तर फोन मोफत का वाटण्यात आले हे याचे कारण जास्त हैराण करणारे आहे.

2,000 Apple iPhone मोफत देण्याचा हि घटना जापान मधील आहे. प्रथमदर्शीनी हि बातमी मजेदार वाटेल पण यामागील कारण धक्कादायक आहे. हे आयफोन एका समुद्री जहाजावरील प्रवाशांना वाटण्यात आले आहेत. झाले असे कि या महिन्याच्या सुरवातीला Diamond Princess cruise नावाच्या एका शिप वर प्रवास करत असलेल्या प्रवाशांमधील एका प्रवाश्याला प्रवाशाला कोरोना वायरसची लागण झाली होती. हि शिप आपल्या प्रवासाला निघाली होती आणि प्रवासात समजले कि एका व्यक्तीला कोरोना वायरसची लागण झाली आहे. या बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधले होते.

हा खतरनाक वायरस एक व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरत आहे आणि प्रवाशांमध्ये कोरोना वायरस पॉजिटिव सापडल्यामुळे त्या शिप वरील सर्व प्रवाशांवर संशय वाढला. हे प्रकरण इतके वाढले कि त्या जहाजाला मीडियाने ‘coronavirus cruise ship’ चे नाव दिले आहे. जापान समवेत संपूर्ण जगभरात सर्वांना चिंता वाटू लागली कि जर शिप वरील हजारो प्रवाशांमध्ये जर हा वायरस पसरला तर स्थिती गंभीर होऊ शकते. जापान सरकारने या समस्येचा सामना शिप मधील 2,000 प्रवाशांना मोफत iPhone वाटून केला.

iPhone चा हा मॉडेल निवडण्यात आला

जापान सरकारने प्रवाशांना 2,000 Apple iPhone दिले आहेत. हे सर्व डिवाईस iPhone 6S आहेत. स्वास्थ्य मंत्रालयाने सर्वात आधी या सर्व आयफोन्स मध्ये एक खास ऍप इंस्टाल करण्यात आला. या ऍपच्या मदतीने सर्व प्रवाशी आणि डॉक्टर्सच्या टीमचा थेट कॉन्टेक्ट करवण्यात आला आहे. जेणेकरून प्रत्येकाला आपल्या तब्येतीची माहिती डॉक्टरला सांगता यावी आणि डॉक्टर्सच्या टीमला प्रत्येक प्रवाशाचा डेटा चांगल्याप्रकारे मिळावा.

iPhone 6S च्या आधी जापान मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, लेबर एंड वेलफेयरने प्रवाशांना एंडरॉयड स्मार्टफोन्स देण्याचा विचार केला होता पण त्यात असे समजले कि फोन मध्ये इंस्टाल केला गेलेला ऍप एंडरॉयड फोन मध्ये समस्या निर्माण करत होता. या महत्वपूर्ण ऑपरेशन मध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने 2000 Apple iPhone 6S वाटण्याचा निर्णय घेतला.

या क्रूज शिप वरून आता प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. सर्वात आधी वृद्ध, अस्वस्थ लोक आणि त्या प्रवाशांना उतरवले जात आहे ज्यांच्या केबिनला खिडकी नव्हती. त्यानंतर हळूहळू इतर प्रवाशांना बाहेर काढले जाईल. coronavirus cruise ship मधुनन काढण्यात आलेल्या या लोकांना खास शिबिरात ठेवण्यात येत आहे जिथे कोरोना वायरसची तपासणी केली जात आहे. या जीवघेण्या कोरोना वायरसमुळे यावर्षी आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी मोबाईल टेक कॉफ्रेंस मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस MWC 2020 पण स्थगित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here