सणांच्या आधी Oppo ने आपल्या मोबाईल ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने OPPO F27 5G मॉडेलची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. किंमतीत कपात केल्यानंतर या फोनला आता 20,999 रुपयांना खरेदी करता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीने हा फोन भारतात ऑगस्टमध्येच लाँच केला होता आणि अवघ्या दीड महिन्यातच फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. तथापि, कंपनीने अद्याप अधिकृतपणे याची घोषणा केली नाही परंतु आम्हाला ऑफलाईन रिटेल स्टोअरद्वारे ही माहिती मिळाली आहे.
OPPO F27 5G च्या किंमतचा तपशील
भारतीय बाजारात OPPO F27 5G ला कंपनीने 8 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी अशा दोन मॉडेल्समध्ये लाँच केले आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेल्या मॉडेलची किंमत 22,999 रुपये होती जी आता 2,000 रुपयांच्या कपातीनंतर 20,999 रुपये झाली आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी मेमरी असलेल्या मॉडेलला कंपनीने 24,999 रुपयांना लाँच केले होते आणि किंमतीमध्ये कपात केल्यानंतर हा फोन आता 22,999 रुपयांना झाला आहे.
OPPO F27 5G चे स्पेसिफिकेशन
OPPO F27 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन कंपनीने ग्लास फिनिशमध्ये सादर केला आहे ज्याच्या बॅक पॅनलमधील वॉच डायल स्टाईल मध्ये रिअर कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाची ॲमोलेड स्क्रीन दिली गेली आहे जी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येत आहे. तर या फोनची स्क्रीन 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते आणि यात 2100 निट्स पीक ब्राईटनेस मिळत आहे.
OPPO F27 5G मीडियाटेक डायमेंसिटी 6300 पॉवर्ड आहे जो माली जी57 एमपी2 जीपीयू सह येत आहे. हा एक ऑक्टा कोर प्रोसेसर आहे जो कमाल 2.4 गिगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. अँड्राईड 14 वर आधारित असलेला हा फोन युएफएस 2.2 ला सपोर्ट करत आहे. यात एक्सपॅन्डेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 2 टीबी पर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड लाऊ शकता.
फोटोग्राफीसाठी OPPO F27 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे आणि कंपनीने एफ/1.8 अपर्चर असलेल्या ओमनीव्हिजन OV50D प्रायमरी सेन्सरचा वापर केला आहे. तर यात एफ/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे, जी एक पोर्ट्रेट लेन्स आहे.
समोर 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे जो सोनी आयएमएक्स615 सेन्सरने सुसज्ज आहे. कॅमेऱ्यासह एआय स्टुडिओ, एआय इरेजर 2.0, एआय स्मार्ट इमेज मॅटिंग 2.0 सारखी काही उत्कृष्ट फिचर्स देखील मिळतील.
OPPO F27 5G फोनमध्ये 5000एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे जी 45 वॉट सुपरवूक चार्जिंगसह येते. फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक दिला गेला आहे. तर, यामध्ये तुम्हाला IP64 रेटिंग मिळत आहे जे काही प्रमाणात पाणी आणि धूळपासून त्याचे संरक्षण करते.














