Honda electric scooter india launch: Electric Scooter ची वाढती मागणी पूर्ण करण्याचे सर्व प्रयत्न टू-व्हीलर कंपन्या करत आहेत. गेले कित्येक दिवसांपासून बातमी येत आहे की Honda देखील देशात एक नवीन ई-स्कूटर (Electric Scooter) सादर करण्याची तयारी करत आहे. आता एका नव्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) नं नवीन हब-बेस्ड इलेक्ट्रिक मोटरची डिजाइन भारतात पेटंट केली आहे. त्यामुळे असे वाटत की नवीन मोटर जास्त कॉम्पॅक्ट असेल आणि Honda’s upcoming new e-scooter मध्ये या मोटारचा वापर केला जाईल. त्यामुळे आशा की होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर देखील लवकरच भारतात लाँच होईल.
Honda upcoming e-scooter
होंडा देशातील काही निवडक मोठ्या टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक आहे, जी अजूनपर्यंत देशात ईव्ही सेगमेंटमध्ये उतरली नाही. दुसरीकडे ज्या कंपन्यांकडे ईव्ही सेगमेंटमध्ये वाहने आहेत त्यांचं मार्केट शेअर वेगानं वाढत आहे. त्यामुळे होंडा लवकरच ईव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करेल, अशी आशा आहे. हे देखील वाचा: दगडू-पालवीची लव्ह स्टोरी ‘या’ OTT वर पाहता येणार; ‘टाइमपास 3’ च्या ऑनलाईन रिलीजची तारीख ठरली
Honda upcoming e-scooter मध्ये येईल नवीन in-wheel मोटर
मीडिया रिपोर्ट्सनुसार HMSI नं भारतात एक नवीन कॉम्पॅक्ट हब मोटर पेटंट केली आहे आणि लवकरच देशात आपल्या नवीन ई-स्कूटरसाठी हिचा वापर करू शकते. हब मोटरची डिजाइन पातळ आणि कॉम्पॅक्ट ठेवण्यात आली आहे. ही व्हीलवरच माउंट करण्यात आली आहे, यामुळे हिला इन-व्हील मोटर असं देखील नाव देण्यात आलं आहे.
ऑटोकार इंडियाच्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये या पेटंट डॉक्युमेंटमध्ये नवीन इन-व्हील मोटरची इमेज देखील शेअर करण्यात आली आहे. होंडानं प्रोडक्ट डिजाइनमध्ये फिट होण्यासाठी होंडा अॅक्टिव्हा 6G ICE-संचालित स्कूटरच्या कम्पोनेंट्सचा वापर केला आहे. इलेक्ट्रिक पावरट्रेन पाहता चेसिसचे बहुतांश कम्पोनेंट्स आणि बाहेरील पॅनलिंग पूर्णपणे वेगळी असेल.
डिजाइनमध्ये मागच्या बाजूला स्विंगआर्म दाखवण्यात आला आहे. तसेच 10-इंचाचा रियर व्हील देखील दिसत आहे. हब मोटर ऑटो रियर ड्रम ब्रेक कम्पोनेंट्स होस्ट करेल. पुढील बाजूस ई-स्कूटर मध्ये 12-इंचाचा टायर मिळण्याची शक्यता आहे, तिथे देखील ड्रम ब्रेकचा वापर करण्यात येईल. किंवा होंडा कधीही फ्रंटला डिस्क सेटअप देखील देऊ शकते. हे देखील वाचा: विवोपेक्षा स्वस्तात रंग बदलणारा स्मार्टफोन; 8GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह Tecno CAMON 19 Pro Mondrian Edition भारतीयांच्या भेटीला
नवीन बॅटरी टेक्नॉलॉजीवर काम करत आहे कंपनी
रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्ससाठी होंडा मोटर कंपनी सध्या सॉलिड-स्टेट बॅटरी विकसित करत आहे, जिचा वापर कंपनीच्या सर्व ई-मोटरबाइक्समध्ये केला जाईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड-स्टेट बॅटरी सध्या वापरात असलेल्या लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत जास्त प्रभावी आणि जास्त ऊर्जा घनत्वसाठी प्रसिद्ध आहे.