200MP कॅमेरा असलेला Infinix Zero Ultra लाँच; फक्त 12 मिनिटांत होणार फुल चार्ज, कंपनीचा दावा

Infinix Zero Ultra

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर Infinix Zero Ultra अखेरीस आज भारतात लाँच झाला आहे. स्वस्त स्मार्टफोन लाँच करणाऱ्या इनफिनिक्स ब्रँडचा हा एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, यातील 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 180W फास्ट चार्जिंग ही या स्मार्टफोनची खासियत आहे. फास्ट चार्जिंगमुळे हा फोन फक्त 12 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. त्याचबरोबर Infinix Zero Ultra मध्कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 920 SoC देखील मिळते. पूढे आम्ही तुम्हाला या 5G हँडसेटच्या किंमत, डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

Infinix ZERO ULTRA चे स्पेसिफिकेशन

Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोन 6.8 इंचाच्या 3D कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा एक FHD+, रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात पंच होल डिजाईन दिली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; वनप्लसच्या तोडीच्या Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक

इनफिनिक्सचा लेटेस्ट स्मार्टफोन Android 12 आधारित XOS 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 SoC ची पावर देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali G68 जीपीयू मिळतो. Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जोडीला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. रियर कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅश, 4K 30fps व्हिडीओ रेकॉडिंगला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला ड्यूल एलईडी फ्लॅशसह 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 180W थंडर चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. त्यामुळे हा फोन फक्त 12 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. या 5G फोनमध्ये USB Type-C आणि स्टिरियो स्पिकर्ससह कनेक्टिव्हिटीसाठी 5G SA/ NSA, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ax, Bluetooth 5.2 आणि GPS सारखे ऑप्शन मिळतात. हे देखील वाचा: या दिवशी येतोय आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख आली

Infinix Zero Ultra 5G ची किंमत

Infinix Zero Ultra स्मार्टफोन 29,999 रुपये (इट्रोडक्ट्री प्राइस) मध्ये सादर करण्यात आला आहे. याची विक्री ई-कॉमर्स साइट Flipkart वर 25 डिसेंबर म्हणजे Christmas Day पासून होईल. हा फोन कंपनीनं Coslight Sliver आणि Genesis Noir अशा दोन कलरमध्ये सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here