OnePlus 11 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; कंपनीनं केली घोषणा

OnePlus 11 5G फोन संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत, ज्यात फोनच्या लाँच, प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सच्या माहितीचा खुलासा झाला होता. आज या फोनची अधिकृत लाँच डेटची माहीत कंपनीनं दिली आहे. कंपनीनं एका इव्हेंटची घोषणा केली आहे ज्यातून वनप्लस 11 5जी 7 फेब्रुवारी 2023 ला भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल सोबतच OnePlus Buds Pro 2 truly wireless earbuds देखील भारतीय बाजारात येऊ शकतात.

OnePlus 11 5G India launch

7 फेब्रुवारीला वनप्लस 11 5जी फोन भारतात लाँच होऊ शकतो. कंपनीनं प्रेस रिलीज पाठवून सांगितलं आहे की येत्या 7 फेब्रुवारी 2023 ला राजधानी नवी दिल्लीमध्ये एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलं जाईल. इव्हेंटला कंपनीनं ‘Cloud 11’ असं नाव दिलं आहे जो संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या मंचावरून कंपनीचा आगामी फ्लॅगशिप डिवायस OnePlus 11 5G भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. स्मार्टफोन सोबतच कंपनीचे नवीन OnePlus Buds Pro 2 TWS पण भारतीय बाजारात येऊ शकतात. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; वनप्लसच्या तोडीच्या Realme GT Neo 5 चे स्पेसिफिकेशन्स लीक

OnePlus 11 Specifications

वनप्लस 11 संबंधित लीक्स आणि अन्य रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. लीकनुसार, हा वनप्लस मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या सुरक्षेसह येऊ शकतो.

OnePlus 11 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सीजनओएस 13 वर लाँच केला जाऊ शकतो ज्यात ऑक्टा कोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार हा वनप्लस मोबाइल 16जीबी पर्यंतच्या रॅमला सपोर्ट करू शकतो तसेच यात 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 48MP IMX581 अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32MP IMX709 2x झूम कॅमेरा दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या सर्व Hasselblad लेन्स असू शकतात. तसेच पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते, जोडीला 5,000एमएएच ची बॅटरी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here