ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम

देशात ऑनलाइन गेमची बाजारपेठ वेगानं वाढत आहे. PUBG आणि BGMI सारखे गेम्सनी वेगळीच उंची गाठली आहे. त्यात भारतातील स्वस्त इंटरनेट डेटा प्लॅन्सनं आणखी हातभार लावला आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे Online Game खेळत खेलते. परंतु आता हे गेम्स खेळणं महागणार आहे. GST Counsil नं मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के टॅक्स द्यावा लागेल.

गेम्समध्ये खर्च होणाऱ्या रकमेवर द्यावा लागणार जीएसटी

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची 50वी मीटिंग पार पडली. ह्या बैठकीत भारतात ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णयानं घेण्यात आला आहे. आधी ऑनलाइन गेमिंग तसेच इन-गेम परचेज (In-game purchases) जीएसटी अंतर्गत न आणण्याचा विचार होता परंतु आता ह्या गेम्समध्ये खर्च केल्या जाणाऱ्या रकमेवर 28% टॅक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन गेमिंगवर होणारा परिणाम

Online Gaming वर 28 टक्के जीएसटीची घोषणा झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोकांनी ह्या निर्णयाचे समर्थन केलं आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या ह्या निर्णयामुळे गेमिंग सेक्टरवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि कंपन्यांच्या कॅशफ्लोवर परिणाम होईल, असं ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीला वाटतं.

28% टॅक्सच्या बातमीमुळे ही इंडस्ट्री नाराज दिसत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोक ह्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. लोकांच्या मते ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे वाया जात आहेत त्यामुळे टॅक्स वाढल्यामुळे लोक गेम्समध्ये कमी पैसे लावतील. ह्या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम PUBG, BGMI, Dream11 आणि My11circle जसे की Fantasy Cricket Fantasy Cricket Apps वर पडू शकता.

भारतात वाढतेय ऑनलाइन गेमिंगची बाजारपेठ

एका रिपोर्टनुसार साल 2016 मध्ये भारतातील ऑनलाइन गेमिंग बाजार 54.30 कोटी डॉलर होता जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये वाढून 2.6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 2027 पर्यंत ही बाजारपेठ 8.6 अब्ज डॉलर पार करेल. तसेच 2021 मध्ये जवळपास 45 कोटी इंडियन ऑनलाइन गेमर्स होते जे एक वर्षानंतर 2022 मध्ये 50 कोटींच्या पार गेले आहेत. तसेच रिपोर्टनुसार साल 2025 पर्यंत इंडियन ऑनलाइन गेमर्सची संख्या 70 कोटींच्या आसपास जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here