OnePlus Summer Launch Event मध्ये OnePlus Nord 4 सोबतच OnePlus Pad 2 पण लाँच झाला आहे. या वनप्लस टॅबलेटनंतर आता Xiaomi ने पण तयारी केली आहे. ही कंपनी येत्या 29 जुलैला Redmi Pad SE 4G भारतात लाँच करेल. या अगामी रेडमी टॅबलेटची लाँचची माहिती व इतर माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Redmi Pad SE 4G भारतातील लाँचची तारीख
शाओमीचा टॅबलेट रेडमी पॅड एसई 4 जी 29 जुलैला भारतात लाँच होईल. जसे की नावावरून समजले आहे की, हा टॅब सेलुलर कनेक्टिव्हिटीसह येईल ज्यात मोबाईल सिम कार्ड पण लावले जाईल. कंपनी वेबसाईटवर Redmi Pad SE 4G पेज लाईव्ह झाले आहे जिथे टॅबलेटचा फोटो तसेच फिचर्स सार्वजनिक आहे. या रेडमी टॅबलेटचे संपूर्ण स्पेसिफिकेशन तसेच किंमतीसाठी 29 जुलै दुपारी 12 वाजता पर्यंतची वाट पहावी लागणार आहे.
Redmi Pad SE 4G चे फिचर्स
- कंपनीने सांगितले आहे की रेडमी पॅड एसई 4 जी टॅबलेट 128GB storage वर लाँच होईल.
- Redmi Pad SE 4G मध्ये HD रेजोल्यूशन असणारी स्क्रीन दिली जाईल ज्याची साईज समोर येईल.
- हा टॅबलेट Dolby Atmos surround sound ला सपोर्ट करेल जो फिल्म पाहण्याची मजा वाढवू शकतो.
- ब्रँडचा दावा आहे की टॅबलेट वजनामध्ये हलका असेल जो वापरामध्ये आरामदेह असेल.
- फोटोग्राफीसाठी रेडमी पॅड एसई 4 जी मध्ये 8MP बॅक कॅमेरा सेन्सर दिला जाईल.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या टॅबलेटमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
Redmi Pad SE किंमत आणि स्पेसिफिकेशन
किंमत : रेडमी पॅड एसई च्या 4GB रॅम मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच 6GB रॅमची किंमत 13,999 रुपये तसेच 8GB रॅमची किंमत 14,999 रुपये आहे. तिन्ही मध्ये ही 128 जीबी स्टोरेज मिळते.
डिस्प्ले : Redmi Pad SE मध्ये 11-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. यात 1920×1200 पिक्सल रिजॉल्यूशन, 400 निट्स ब्राईटनेस, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 84.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो.
प्रोसेसर : टॅबलेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर लावला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू आहे.
कॅमेरा : नवीन रेडमी टॅबमध्ये f/2.3 अपर्चरसह 8MP चा बॅक कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5MP चा कॅमेरा लावला आहे.
बॅटरी : Redmi Pad SE मध्ये जबरदस्त 8,000mAh ची मोठी बॅटरी आहे. यात 10W चार्जिंगला सपोर्ट मिळतो.
इतर आणि कनेक्टिव्हिटी : टॅबमध्ये वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाईप-सी पोर्ट, डॉल्बी अॅटमॉस आणि स्टीरियो स्पिकर सारखे अनेक पर्याय आहेत.
ओएस : Redmi Pad SE टॅबलेट अँड्रॉईड 13 आधारित MIUI 14 वर आधारित ठेवला आहे.
डायमेंशन : टॅबलेटचे डायमेंशन 255.53mm x 167.08mm x 7.36mm आहे.
















