भन्नाट! 19 हजारांत 8GB RAM असलेला फोन; लाँच होण्याआधीच Vivo Y35 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा

आकडेच बातमी आली होती की Vivo लवकरच भारतीय बाजारात Y35 स्मार्टफोन लाँच करू शकते. कंपनीनं हा फोन आधीच जागतिक बाजारात लाँच केला आहे जिथे याच्या सर्व स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. परंतु फोनच्या प्राइसबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. आज 91मोेबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन फक्त एकच मेमरी व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात येणार आहे आणि फोनची किंमत 18,499 रुपये असेल. आम्हाला ही माहिती Vivo च्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे जे कंपनीसोबत अनेक वर्षांपासून काम करत आहेत.

Vivo Y35 ची किंमत आणि कलर

Vivo Y35 कंपनी इट्स माय स्टाईल स्लोगनसह लाँच करणार आहे आणि हा फोन कंपनीद्वारे लाँच Y33s आणि Y33T ची जागा घेईल. कंपनी हा फोन एगट ब्लॅक आणि डॉन गोल्ड कलरमध्ये सादर करणार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार फोनची MRP म्हणजे बॉक्स प्राइस 22,999 रुपये असेल. तर फोनची सेल प्राइस MOP 18,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो.

Vivo Y35 चे सेलिंग पॉईंट

कंपनीनं फोनच्या काही सेलिंग पॉईंटची माहिती दिली आहे. त्यानुसार यात 8जीबी+8जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजे फोनमध्ये 8जीबी रॅमसह 8जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट मिळेल. तसेच 44 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळेल. हा फोन 50 एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह लाँच होईल. तर 16 एमपी चा सेल्फी कॅमेरा असेल.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन

विवो वाय35 4जी फोन 20:9 अस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेमध्ये 550निट्स ब्राइटनेस तसेच एनटीएससी कलर गमुट सारखे फीचर्स देखील आहेत. या फोनचे डायमेंशन 164.376.1×8.28एमएम आणि वजन 188 ग्राम आहे.

Vivo Y35 4G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल 8 जीबी रॅमवर सादर करण्यात आला आहे जो एक्स्ट्रा 8जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो. म्हणजे एकूण 16 जीबी रॅमची पावर या फोनमध्ये मिलती आहे. इंटरनल स्टोरेज 128 जीबी आहे जी 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी विवो वाय35 4जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y35 4G ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here