Motorola ने जागतिक मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Moto G85 5G लाँच केला आहे. हा मोबाईल 24GB RAM (12GB+12GB) च्या ताकदीसह आहे ज्यात 32MP Selfie आणि 50MP Rear कॅमेरा मिळतो. येत्या काही दिवसांमध्ये हा फोन भारतीय बाजारात पण लाँच केला जाऊ शकतो. मोटो जी 85 5 जी फोनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Moto G85 5G किंमत (जागतिक)
मोटोरोलाने आपल्या नवीन स्मार्टफोनला 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजवर लाँच केले आहे. Moto G85 5G फोनची जागतिक किंमत £299.99 आहे जो भारतीय चलनानुसार 31,700 रुपयांच्या आसपास आहे. मार्केटमध्ये या मोबाईल फोनला Urban Grey, Olive Green आणि Cobalt Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
Moto G85 5G स्पेसिफिकेशन (जागतिक)
- 6.67″ 3 डी कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 3
- 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
- 12 जीबी रॅम बूस्ट टेक्नॉलॉजी
- 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
स्क्रीन : Moto G85 5G फोन 20:9 अॅस्पेक्ट रेश्योवर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67 इंचाच्या FHD+ pOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही 3D Curved स्क्रीन आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 1600nits ब्राईटनेस तसेच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह आहे.
प्रोसेसर : मोटोरोला जी 85 5 जी फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा Snapdragon 6s Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.
मेमरी : Moto G85 5G 12GB RAM ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये RAM Boost टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जो फिजिकल रॅममध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम जोडून याला 24GB RAM च्या ताकदीसह प्रदान करतो. तसेच मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 1TB चे मेमरी कार्ड लावला जाऊ शकते.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी मोटो जी 85 5 जी स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 50MP मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असणाऱ्या 8MP Ultrawide लेन्स सह मिळून चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP Front Camera मिळतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी मोटोरोला मोटो जी 85 5 जी फोनमध्ये 5,000mAh Battery देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 30W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह करण्यात आले आहे.
इतर फिचर्स : मोटो जी 85 5 जी स्मार्टफोनमध्ये NFC, Bluetooth 5.1 आणि 5GHZ Wi-Fi सह 13 5G Bands मिळतात. कंपनी आपल्या नवीन मोबाईल फोनला 4 वर्षाच्या ओएस अपग्रेड सह घेऊन आली आहे.















