विवो आपल्या वाय सीरीजमध्ये कंपनीचे स्वस्त स्मार्टफोन सादर करते. त्यामुळे ही सीरिज ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. आता कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत एक नवीन मोबाइल फोन विवो वाय02एस लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्यातरी कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु लवकरच भारतीयांच्या सेवेत देखील हा हँडसेट दाखल होऊ शकतो. जो कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. Vivo Y02s स्मार्टफोन 3GB RAM, MediaTek Helio P35 आणि 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे.
Vivo Y02s चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय02एस स्मार्टफोनमध्ये कंपनीनं वॉटरड्रॉप नॉच डिजाइन दिली आहे, ज्यात स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आला आहे. यात 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाइल फोनला 2.5डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच याचे डायमेंशन 163.95×75.55×8.19 एमएम व वजन 182 ग्राम आहे.हे देखील वाचा: ‘No Network’ मध्ये देखील फोनवरून करता येतो कॉल; जाणून घ्या ही शानदार ट्रिक
Vivo Y02s अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो फनटच ओएससह मिळून चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. सोबतीला मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आहे. हा विवो मोबाइल 3 जीबी रॅमला सपोर्ट तसेच 32 जीबी इंटरनल मेमरी देखील मिळते.
फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मोड्यूल मिळतो, ज्यात दोन वर्तुळाकार सेन्सर आहेत. परंतु यातील एक कॅमेरा तर दुसरा एलईडी फ्लॅश आहे. फोटोग्राफीसाठी विवो वाय02एस सिंगल रियर कॅमेराचा मिळतो. या लो बजेट मोबाइल फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा Vivo Y02s मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: फक्त 16,999 रुपयांमध्ये मिळतोय 8GB रॅम आणि 128GB मेमरी असलेला OPPO फोन
Vivo Y02s एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे जो 4जीला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
Vivo Y02s ची किंमत
विवो वाय02एस स्मार्टफोन चीनमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे जो 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या लो बजेट स्मार्टफोनची किंमत 906 युआन आहे जी भारतीय चलनात 10,600 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन Sapphire Blue आणि Shine Black कलरमध्ये लाँच झाला आहे. भारतीय लाँचची अधिकृत माहिती मात्र समोर आली नाही.

















