OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2

Highlights

  • 4 एप्रिलला भारतात वनप्लसचा ‘लार्जर दॅन लाइफ’ इव्हेंट होईल.
  • या इव्हेंटमध्ये OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन लाँच केला जाईल.
  • वनप्लस फोन सोबतच OnePlus Nord Buds 2 देखील होतील.

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला भारतात लाँच होईल. आज कंपनीनं अधिकृतपणे या फोनच्या लाँचवरून पडदा हटवला आहे. त्याचबरोबर खुलासा करण्यात आला आहे की या दिवशी OnePlus चे नवीन टीडब्लूएस Nord Buds 2 देखील सादर केले जातील. फोन स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीनं आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही परंतु लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे.

वनप्लस लाँच इव्हेंट

वनप्लस इंडियानं सांगितलं आहे की कंपनी येत्या 4 एप्रिलला भारतात नवीन इव्हेंटचं आयोजन करत आहे ज्याचे नाव ‘Larger than life – A OnePlus Nord Launch Event’ असं ठेवण्यात आलं आहे. हा इव्हेंट संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल ज्याच्या मंचावरून OnePlus Nord CE 3 Lite 5G आणि OnePlus Nord Buds 2 भारतात लाँच केले जातील. हा लाँच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, युट्युब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जीचे लीक स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 3 Lite 5G संबंधीत लीक्स पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकते. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असू शकते ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. ही स्क्रीन पंच-होल स्टाईल असू शकते.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी फोन अँड्रॉइड 13 वर सादर केला जाऊ शकतो, जोडीला आक्सिजनओएस 13 असण्याची शक्यता आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. लीक्सनुसार हा फोन 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो, जोडीला 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन फक्त 12,499 रुपयांमध्ये! Tecno Spark 10 Pro ची भारतात एंट्री

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 108 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो मॅक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सरसह येऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी या वनप्लस फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here