Volvo ची पहिली इलेक्ट्रिक कार XC40 Recharge भारतात लाँच, सिंगल चार्जमध्ये 400km पेक्षा जास्त रेंज

Volvo नं भारतात Volvo XC40 Recharge नावाची premium electric SUV लाँच केली आहे. या कारची सर्वात खास बाब अशी आहे की ही भारतात असेंबल होणारी पहिली लग्जरी ईव्ही आहे. याआधी भारतात लाँच करण्यात आलेली कोणतीही ईव्ही भारतात असेंबल करण्यात आली नव्हती. बुधवारी या कारची बुकिंग सुरु होताच फक्त दोन तासांमध्ये कंपनीचे सर्व 150 यूनिट्स विकले गेले. कंपनीनं वोल्वो XC40 रिचार्ज गेल्यावर्षी भारतात प्रदर्शित केली होती. पुढे तुम्हाला Volvo XC40 Recharge (वोल्वो XC40 रिचार्ज) इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या किंमतीपासून फीचर्स पर्यंतची संपूर्ण माहिती दिली आहे.

Volvo XC40 ची किंमत

Volvo XC40 Recharge premium electric SUV भारतात Rs 55.90 lakh (ex-showroom) किंमतीत सादर करण्यात आली आहे. तसेच XC40 Recharge ची किंमत पेट्रोल ICE-संचालित व्हेरिएंट पेक्षा 11.40 लाख रुपये जास्त आहे. ही कार वाहन 27 जुलैपासून 50,000 रुपयांच्या टोकन बुकिंग रकमेसह वोल्वो इंडियाच्या वेबसाईटवरून ऑर्डर करता येईल.

वोल्वो XC40 रिचार्ज ट्विन-मोटर पावरट्रेन स्वरूपात सादर करण्यात आली आहे. ही एकमेव अल्टीमेट ट्रिम लेव्हलवर उपलब्ध करण्यात येईल. तसेच ही ईव्ही क्रिस्टल व्हाईट, फोजर्ड ब्लू, ओनिक्स ब्लॅक, सेज ग्रीन आणि थंडर ग्रे कलर ऑप्शनमध्ये आली आहे. इतकेच नव्हे तर कंपनीनं XC40 रिचार्ज चारकोल कनेक्ट साबर टेक्सटाइल इंटीरियर स्कीममध्ये सादर केली आहे.

तीन वर्षांची वॉरंटी

वोल्वो कारवर तीन वर्षांची वॉरंटी, तीन वर्षांचे वोल्वो सर्व्हिस पॅकेज, 3 वर्षांचे ऑन रोड असिस्टंस, आठ वर्षांची बॅटरी वॉरंटी, डिजिटल सर्व्हिसेसचं चार वर्षांचं सब्सस्क्रिप्शन मिळेल. तसेच, यात थर्ड पार्टी 11kW वॉल बॉक्स चार्जर देखील दिला जात आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिजाइन: XC40 चांगली दिसणारी SUV आहे आणि हिचं इलेक्ट्रिक व्हर्जन पेट्रोल व्हर्जन सारखंच आहे. स्वीडिश कार निर्माता कंपनीनं एलईडी हेडलाईटमध्ये थॉरच्या हातोडीप्रमाणे फ्रंट सिग्नेचर डीआरएल कायम ठेवली आहे, आणि स्टॅक्ड रियर एलईडी लाईटिंग सिस्टम देखील आहे. तसेच कारमध्ये एक ब्लँक्ड-आउट ग्रिल आणि 19-इंच ड्यूल-टोन अलॉयचा एक नवीन सेट देखील मिळतो. बूटची क्षमता 452 लीटर आहे.

फीचर्स: यात पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, लेव्हल 2 ऑटोनॉमस ड्राईव्हिंग सेन्सर-आधारित ADAS टेक्नॉलॉजीचा एक संपूर्ण सूट, कनेक्टेड कार टेक, ड्राईव्हर-साइड मेमरीसह पावर्ड फ्रंट सीट्स आणि एक प्रीमियम हरमन कार्डन साउंड सिस्टम देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स: वोल्वो XC40 रिचार्ज 78kWh बॅटरी पॅकसह ट्विन मोटर पावरट्रेनसह येते. यातील बॅटरी पॅक 150kW फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, त्यामुळे फक्त 33 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. पारंपरिक 50kW फास्ट चार्जर ही वोल्वो 2.5 तासांमध्ये 100 टक्के पर्यंत चार्ज करू शकतो. पावरट्रेन, 480bhp ची पीक पावर आणि 660Nm पीक टॉर्क देतो. XC40 रिचार्ज को 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. XC40 रिचार्जची ट्विन मोटर सेटअप AWD सेट-अपच्या क्षमतेसह येते. XC40 रिचार्ज एकदा चार्ज केल्यावर 418km ची रेंज देते असा दावा करण्यात आला आहे.

रेंज आणि टॉप स्पीड: वोल्वो XC40 रिचार्ज इलेक्ट्रिक एसयूव्ही युजर्सना 418 किमीची रेंज देत असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि 150kW वर फास्ट चार्ज करण्याची क्षमता देखील या कारमध्ये आहे. तसेच ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. हिचा टॉप स्पीड 180 किमी प्रति तास इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here