दोन स्वस्त Electric Scooter भारतात लाँच; ड्रायविंग लायसन्सविना चालवता येणार

इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप जीटी फोर्स (GT Force) नं भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपले दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Scooter) GT Soul आणि GT One लाँच केले आहेत. हे बॅटरी असलेले स्कूटर्स कंपनीनं अफोर्डेबल प्राईस कॅटेगरीमध्ये सादर केले आहेत. आता या स्कूटर्सच्या जीवावर कंपनी भारतात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम करत आहे. चला जाणून घेऊया या नव्या electric scooter ची किंमत, रेंज आणि फीचर्सची माहिती.

GT Soul Electric Scooter के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

GT Soul बद्दल बोलायचे तर ही चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही ड्राईव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही कारण ही एक स्लो-स्पीड कॅटेगरीमधील इलेक्ट्रिक स्कूटर आहे. हिचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे जो Electric Cycle मध्ये देखील मिळतो. तसेच ही बॅटरी स्कूटी कंपनीनं लीड 48V 28Ah आणि लिथियम 48V 24Ah बॅटरी या दोन व्हर्जनमध्ये सादर केली आहे. ही एकदा चार्ज केल्यावर 60-65kms पर्यंतची रेंज देऊ शकते. इतकेच नव्हे तर जीटी सोलची लोडिंग क्षमता 130 किलोग्रॅम आहे. तसेच सीटची उंची 760 मिमी आणि ग्राउंड क्लियरन्स 185 मिमी आहे.

फीचर्स पाहता कंपनीनं यात अँटी-थेफ्ट अलार्मसह सेंट्रल लॉकिंग, पार्किंग मोड आणि रिवर्स मोड सारखे शानदार फीचर्स दिले आहेत. तसेच ही स्कूटर 18 महिन्यांच्या मोटर वॉरंटी, एक वर्षांच्या लीड बॅटरी वॉरंटी आणि तीन वर्षांच्या लिथियम-आयन बॅटरी वॉरंटीसह सादर करण्यात आली आहे.

GT One Electric Scooter चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

जीटी वन देखील सोलप्रमाणे एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी चालवण्यासाठी ड्रायविंग लायसन्सची आवश्यकता नाही. तसेच हिचा टॉप स्पीड देखील ताशी 25km इतका आहे. तसेच यात देखील लीड 48V 24Ah आणि लिथियम 48V 28Ah बॅटरी असे दोन व्हर्जन सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार फुल चार्जवर ही स्कूटर 60 ते 65 किमी पर्यंत धावू शकते.

GT One Electric Scooter हाय पावर वाले ट्यूबलर फ्रेमवर बनवण्यात आली आहे. त्यामुळे हिची लोडिंग क्षमता 140 किलोग्राम इतकी आहे. तसेच सीटची उंची 725 मिमी आणि ग्राउंड क्लियरन्स 155 मिमी आहे. यात अँटी-थेफ्ट अलार्म सह सेंट्रल लॉकिंग, पार्किंग मोड, रिवर्स मोड, मोबाईल चार्जिंग आणि क्रूज कंट्रोल सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत

किंमत पाहता, कंपनीनं दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर खूप किफायतशीर दरात भारतात लाँच केल्या आहेत. कंपनीची GT Soul स्कूटर 49,996 रुपयांमध्ये (एक्स शोरूम इंडिया) सादर करण्यात आली आहे. तसेच GT One ची किंमत 59,800 रुपये (एक्स शोरूम इंडिया) ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here