50MP Camera सह येईल स्वस्त Moto G14! लाँचपूर्वीच समोर आले फोटो आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Moto G14 कर्व्ड एज बॉडीसह दाखवण्यात आला आहे.
  • फोन beige, blue, grey आणि gold कलरमध्ये दाखवण्यात आला आहे.
  • हा मोाबइल फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

मोटोरोलानं मार्चमध्ये स्वस्त स्मार्टफोन Moto G13 भारतात लाँच केला होता ज्याची किंमत फक्त 9,999 रुपये होती. आता कंपनी ह्याच्या अपग्रेडेड व्हर्जन Moto G14 वर काम करत आहे जो गेल्या काही दिवसांपासून अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे. एका नवीन लीकमध्ये मोटो जी14 ची रेंडर ईमेज देखील समोर आली आहे ज्यात फोनच्या लुक व डिजाइनची माहिती मिळाली आहे.

Moto G14 ची डिजाइन (लीक)

फ्रंट पॅनल : समोर आलेल्या फोटोजवरून समजलं आहे की हा मोटोरोला फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाईल. सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी आणि बॉडी एजपासून देण्यात आला आहे. फोनमध्ये फ्लॅट स्क्रीन दिसत आहे जी तिन्ही बाजूंना बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे.

साइड फ्रेम : Moto G14 कर्व्ड एज बॉडीसह दाखवण्यात आला आहे. लीक झालेल्या फोटोजनुसार ह्याच्या उजवीकडे वॉल्यूम अप आणि वॉल्यूम डाउन बटन देण्यात आला आहे ज्याच्या खाली पावर बटन देखील आहे. ह्याच्या वरच्या फ्रेम वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एकीकडे डॉल्बी अ‍ॅटमॉस लिहिण्यात आलं आहे. तसेच लोवर फ्रेमवर यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे जोडीला स्पिकर देखील मिळू शकतो.

बॅक पॅनल : मोटोरोलाचा रियर पॅनल सपाट आहे तर डावीकडे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात दोन कॅमेरा सेन्सर वर्टिकली प्लेस्ड आहेत ज्यांच्या बाजूला एलईडी फ्लॅश आणि लेन्सची माहिती आहे. पॅनलच्या मध्यभागी Motorola ची ब्रँडिंग आहे. लीक फोटोजनुसार फोन beige, blue, grey आणि gold कलरमध्ये दाखवण्यात आला आहे.

Moto G14 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 128GB Storage
  • 50MP Rear Camera

  • 5,000mAh battery

  • 20W fast charging

  • फोन संबंधित लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
  • प्रोसेसिंगसाठी मोटो जी14 मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं समोर आलं आहे.
  • लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोाबइल फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.
  • पावर बॅकअपसाठी Moto G14 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
  • त्याचबरोबर मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्या फोनमध्ये 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील दिली जाऊ शकते.

Moto G14 ची लाँच डेट (लीक)

Motorola नं आतापर्यंत आपल्या आगामी मोबाइल फोन मोटो जी14 च्या लाँच बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु समोर आलेल्या लीकनुसार हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये टेक मार्केटमध्ये येऊ शकतो. ग्लोबल लाँच सोबतच Moto G14 भारतीय बाजारात देखील उपलब्ध होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here