50MP Camera असेलल्या OPPO A77s ची किंमत झाली कमी; कंपनीनं केली घोषणा

oppo mobile phone offer discount on smartphones oppo winter season sale
Highlights

  • Oppo A77s च्या किंमतीत 1,500 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
  • कंपनीनं हा फोन गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सादर केला होता.
  • फोनमध्ये 8जीबी वर्चुअल रॅम आहे.

OPPO नं आपल्या मिडबजेट ग्राहकांसाठी गेल्यावर्षी एक नवीन स्मार्टफोन OPPO A77s लाँच केला होता. ए सीरीजमधील ह्या मोबाइलमध्ये 50MP Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 33W 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. 17,999 रुपयांच्या ह्या स्मार्टफोनची किंमत आता कंपनीनं कमी केली आहे. चला जाणून घेऊया नवी किंमत.

OPPO A77s ची नवीन किंमत

OPPO A77s स्मार्टफोन भारतात 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत आता 16,499 रुपये करण्यात आली आहे. कंपनीनं फोनच्या किंमतीत 1,500 रुपयांची कायमस्वरूपी कपात केली आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज, तसेच Sunset Orange आणि Starry Black कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO A77s चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए77एस स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच ओप्पो या मोबाइल डिस्प्लेमध्ये 600निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट देखील मिळतो. OPPO A77s मध्ये स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईल असलेली आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

OPPO A77s अँड्रॉइड आधारित कलर ओएस 12.1 वर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आहे जो 5जीबी वचुर्अल रॅमला देखील सपोर्ट करतो. म्हणजे गरज पडल्यास ओप्पो ए77एस 13जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो. तसेच फोन स्टोरेज मेमरी कार्डनं 1टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए77एस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल मोनो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO A77s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी ओप्पो मोबाइलच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो ए77एस मध्ये 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here