Apple बनवत आहे 2 कोटी foldable iPhone, काहीतरी मोठे करण्याची आहे योजना

Foldable iPhone चा प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

Apple एकमेव अशी टेक कंपनी आहे जी निवडक मोबाईल फोन लॉन्च करते पण त्या मोबाईल फोन्सच्या जीवावर टॉपवर असते. अ‍ॅप्पलचे iPhone प्रीमियम क्वॉलिटीसाठी ओळखले जातात आणि महाग असूनही लोकांना हे आवडतात. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते कि अ‍ॅप्पल पण आपल्या फोल्डेबल फोनवर काम करत आहे आणि हा 2023 मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच आता या foldable iPhone संबंधित अजून एक नवीन आणि मोठा अपडेट समोर आला आहे. (Apple could ship 20 million foldable iPhone in 2023)

foldable iPhone ची पहिली बातमी प्रसिद्ध एनॉलिस्ट कुओ यांनी दिली होती आणि त्यांनी सांगितले होते कि Apple कंपनी घडी होणाऱ्या मोबाईल फोनवर काम करत आहे आणि हा पहिला फोल्डेबल आयफोन साल 2023 मध्ये सादर केला जाईल. तसेच आता कुओने अजून एक नवीन माहिती दिली आहे कि अ‍ॅप्पलची योजना आहे कि या फोल्डेबल फोनचे 20 मिलियन यूनिट लॉन्चच्या पहिल्या वर्षात जगभरात विकले जातील.

2 कोटी foldable iPhone

Apple आपल्या फोल्डेबल आयफोन्सच्या निर्मितीत गुंतली आहे आणि कंपनी हे साल 2023 मध्ये बाजारात घेऊन येईल. नवीन रिपोर्टनुसार अ‍ॅप्पल कंपनीने टारगेट ठेवले आहे कि लॉन्चच्या पहिल्या वर्षातच या foldable iPhone चे 20 मिलियन यूनिट म्हणजे 2,00,00,000 फोल्डेबेल आयफोन संपूर्ण जगभरात विकले जातील. रिपोर्टनुसार अ‍ॅप्पलला अपेक्षा आहे कि वर्ष 2023 मध्ये 15 ते 20 मिलियन फोल्डेबल आयफोन मोबाईल युजर्सद्वारे विकत घेतले जातील.

Foldable iPhone चा फोटो

Samsung देणार फोल्डेबल डिस्प्ले

20 मिलियन शिपमेंटच्या मोठ्या टारगेटसह Apple ने अपने फोल्डेबल फोनची निर्मिती सुरु केली आहे. या मोबाईल फोन्समधील फोल्डेबल ओएलईडी डिस्प्लेसाठी अ‍ॅप्पलने टेक कंपनी Samsung शी भागेदारी केली आहे आणि सॅमसंगच foldable OLED display ची एक्सक्लूसिव सप्लायर असेल.

हे देखील वाचा : iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट

असा असेल घडी होणारा आयफोन

रिपोर्टनुसार Apple foldable iPhone चा डिस्प्ले 7.5 इंच ते 8 इंचापर्यंत असू शकतो तसेच कुओच्या नवीन अपडेटनुसार अ‍ॅप्पलचा हा पहिला फोल्डेबल आयफोन 8 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोनमध्ये अ‍ॅप्पलचा लेटेस्ट बॉयोनिक चिपसेट दिला जाईल त्याचबरोबर अ‍ॅडव्हान्स आयओएस को मिळेल. हा आयओएस वर्जन फोल्डेबल मोबाईलच्या फंक्शन्सनुसार बनवला जाईल. पण या फोल्डेबल आयफोनसाठी 2023 ची वाट बघावी लागेल.

अ‍ॅप्पल आयफोन 12 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here