64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • रियलमी सी55 16GB Dynamic RAM ला सपोर्ट करतो.
  • या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
  • Realme C55 MediaTek Helio G88 वर चालतो.

रियलमी कंपनीनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Realme C55 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल लो बजेट सेग्मेंटमध्ये आला आहे. रियलमी सी55 स्मार्टफोननं 64MP Rear Camera सह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे जो 16GB Dynamic RAM च्या पावरसह येतो. या फोनची किंमत, सेल सोबतच फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी सी55 ची किंमत

रियलमी सी55 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट कंपनीनं भारतात आणले आहेत. यातील 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजची किंमत 10,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे तर 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 13,999 रुपयांमध्ये मिळेल. या फोनची विक्री 28 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर सुरु होईल. कंपनीनं Rainy Night आणि Sunflower हे दोन कलर व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.

रियलमी सी55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 90Hz FHD+ LCD display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Helio G88
  • 64MP Rear Camera
  • 5,000mAh battery
  • 33W SuperVOOC charging

Realme C55 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची थिकनेस फक्त 7.89एमएम आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

रियलमी सी55 अँड्रॉइड 13 ओएसवर सादर केला जाईल जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजी देण्यात आली जो फोनच्या इंटरनल 8जीबी रॅमला 16जीबी रॅम पर्यंत वाढवू शकतो.

फोटोग्राफीसाठी Realme C55 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज

पावर बॅकअपसाठी रियलमी सी55 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल जो 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. हा फोन ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सहित बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here