फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज

Highlights

  • भारतात लवकरच विकला जाईल Tecno Phantom V Fold 5G स्मार्टफोन.
  • हा फोन MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह येईल.
  • हा भारतात येणारा टेक्नोचा पहिला फोल्डेबल फोन असेल.

MWC 2023 मध्ये TECNO PHANTOM V Fold 5G च्या इंडियन प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिल्यानंतर आता फोन टीज करण्यासाठी सुरु केली आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सांगितलं आहे की लवकरच हा फोन भारतात येत आहे. सध्या या फोल्डेबल फोनच्या सेल डेटची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, ट्विट मध्ये कमिंग सून लहिण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती.

टेक्नो फँटम व्ही फोल्डची इंडिया प्राइस

टेक्नो फँटम व्ही फोल्ड 5जी फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल. फोनच्या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमतीची ऑफिशियल माहिती आधीच समोर आली आहे. डिवाइसच्या 12GB + 256GB व्हर्जनची किंमत 89,999 रुपये तर 12GB + 512GB व्हेरिएंट 99,999 रुपयांमध्ये बाजार खरेदीसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा

टेक्नो फँटम व्ही फोल्डचे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो फोन दोन डिस्प्लेसह येतो. फोनची मुख्य स्क्रीन 7.65 इंचाची आहे. हा 2296 x 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2के+ डिस्प्ले आहे जो एलटीपीओ अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. त्यामुळे जेव्हा फोन फोल्ड केला जातो तेव्हा बाहेर 6.42 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिसतो. ही 1080 x 2550 पिक्सल रिजोल्यूशन असलेली अ‍ॅमोलेड स्क्रीन आहे. TECNO PHANTOM V Fold 5G फोनचे दोन्ही डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

टेक्नो फँटम व्ही फोल्ड 5जी फोन को 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी710जीपीयू आहे. हा टेक्नो फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. अँड्रॉइड 13 सह हा फोन हायओएस फोल्ड व्हर्जनवर चालतो.

फोटोग्राफीसाठी या टेक्नो फोनमध्ये अल्ट्रा क्लियर 5 लेन्स फोटोग्राफी सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या बाहेरील आणि आतील दोन्ही डिस्प्लेवर सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोन फोल्ड केल्यानंतर जी स्क्रीन बाहेर राहते त्यावर 32 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. तर फोन उघडल्यावर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. हे देखील वाचा: 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये

रियर कॅमेरा सेटअप पाहता बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 50 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चर असेलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 45वॉट फास्ट चार्जिग टेक्नॉलॉजी से लैस 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here