11,999 रुपयांमध्ये 8GB RAM; Moto G32 भारतात लाँच, 22 मार्चपासून सुरु होईल विक्री

Highlights

  • मोटो जी32 8जीबी रॅम असलेला भारतातील किफायतशीर स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • हा फोन 22 मार्चपासून 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
  • Moto G32 4GB RAM व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये आहे.

Motorola नं गेल्यावर्षी 2022 मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Moto G32 लाँच केला होता जो 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेजसह सेलसाठी उपलब्ध झाला होता. काल कंपनीनं या फोनचा अजून एक नवीन व्हेरिएंट 8GB RAM + 128GB storage सह भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीनं मोटो जी32 स्मार्टफोन 8जीबी रॅम असलेला भारतातील सर्वात किफायतशीर फोन असल्याचं सांगण्यात आलं आहे जो फक्त 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

मोटो जी32 ची किंमत

सर्वप्रथम नवीन व्हेरिएंट पाहता, यात 8जीबी रॅमसह 128जीबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा 8जीबी रॅम व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये येत्या 22 मार्चपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होईल जो Satin Silver आणि Mineral Grey कलरमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा दुसरा व्हेरिएंट 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 10,499 रुपये आहे. हे देखील वाचा: 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये

मोटो जी32 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ FHD+ 90Hz Display
  • Qualcomm Snapdragon 680
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 33W 5,000mAh Battery

Moto G32 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. हा फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो तीन वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे. हे देखील वाचा: फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा रियर कॅमेरा सेटअप 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड लेन्स आणि थर्ड मायक्रो सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोटो फोन 33वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here