iQOO Z9s सीरीज आज भारतात अधिकृतपणे लाँच झाली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro हे दोन नवीन फोन्स लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन्स वेगवेगळ्या डिझाईन्स आणि जवळपास सारख्याच स्पेसिफिकेशन सह सादर करण्यात आले आहेत. या फोन्समध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग, कर्व्ह डिस्प्ले, व्हेगन लेदर आणि उत्तम कॅमेरा पाहायला मिळेल. चला या पोस्टमध्ये तुम्हाला सीरीजच्या प्रो मॉडेलबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती देऊ.
iQOO Z9s Pro ची किंमत
- iQOO Z9s Pro ला कंपनीने तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केले आहे.
- या डिव्हाईसच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे.
- तर, 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.
या फोनला कंपनीने व्हेगन लेदर बॅकसह लक्स मार्बल आणि फ्लॅम्बॉयंट ऑरेंज कलर पर्यायांमध्ये लाँच केले आहे.
iQOO Z9s Pro ची विक्री आणि ऑफर तपशील
iQOO Z9s Pro ची पहिली विक्री 23 ऑगस्ट रोजी iQOO च्या ऑनलाईन स्टोअर आणि ॲमेझॉन वर होणार आहे. याशिवाय या सेलमध्ये तुम्हाला आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक कार्डवर 3,000 रुपयांची झटपट सूट आणि iQOO Z9s Pro वर 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
iQOO Z9s Pro चे डिझाईन आणि लूक
iQOO Z9s Pro बद्दल बोलायचे झाल्यास हा तुम्हाला कंपनीच्या फ्लॅगशिप iQOO 12 ची आठवण करून देईल. कंपनीने या नवीन हँडसेटच्या मागील बाजूस स्क्विर्कल कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. त्याचवेळी स्मार्टफोनमध्ये कॅमेरा रिंगसह ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय, फोनच्या समोर एक 3D कर्व्ह डिस्प्ले आहे आणि मध्यभागी एक होल-पंच दिलेला आहे. तर अल्ट्रा स्लिम बेझल्स असलेल्या या फोनच्या फ्लॅम्बॉयंट ऑरेंज व्हेरिएंटचे वजन 185 ग्रॅम आहे आणि लक्स मार्बल व्हेरिएंटचे वजन 190 ग्रॅम आहे.
iQOO Z9s Pro चे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स
- डिस्प्ले: या फोनमध्ये कंपनीने 6.77 इंचाचा कर्व्ह डिस्प्ले (2392×1080 पिक्सेल) दिला आहे. हा 1 अब्जाहून अधिक रंग आणि 120Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहे. याशिवाय यात 4500 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशात स्क्रीन पाहतानाही तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. त्याचवेळी यात वेट टच तंत्रज्ञान दिले गेले आहे जे आपल्याला ओल्या हातांनी देखील स्क्रीन अनलॉक करण्यास मदत करते.
- प्रोसेसर: कंपनीने या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 दिला आहे जो थर्ड-जनरेशन TSMC 4nm प्रोसेस टेक्नॉलॉजीवर बनवला आहे. यात ऑक्टा-कोर CPU मध्ये 1+3+4 (2.63 GHz + 2.40 GHz + 1.80 GHz) डिझाईन समाविष्ट आहे. जे सहजतेने मल्टीटास्किंग ला हाताळते. यात ॲड्रेनो 7 सीरीज GPU (720) देखील दिला गेला आहे, ज्यामुळे AI इंजिनसह प्रति वॉट परफॉर्मन्समध्ये 60% सुधारणा पहायला मिळते.
- मेमरी: कंपनीने हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. हा फोन 8GB + 128GB व्हेरिएंट, 8GB + 256GB व्हेरिएंट आणि 12GB + 256GB व्हेरिएंटमध्ये येतो. याशिवाय कंपनीने या फोनसोबत 12GB रॅम पर्यंत एक्सपांडेबल चा पर्याय देखील दिला आहे.
- कॅमेरा: या फोनमध्ये एफ/1.79 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सेलचा Sony IMX882 OIS प्रायमरी कॅमेरा आणि एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा दिला गेला आहे. त्याचवेळी कंपनीने फ्रंटला एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सेलचा (Samsung S5K3P9SP04-FGX9) कॅमेरा दिला आहे.
- बॅटरी: फोनमध्ये 5500mAh ची अल्ट्रा-थिन बॅटरी आहे जी 80 वॉट फास्ट फ्लॅश चार्जिंगने सुसज्ज आहे. कंपनीने दावा केला आहे की या फोनमध्ये 4 वर्षांची बॅटरी लाईफ मिळेल. त्याचवेळी हा फोन 4 वर्षे दररोज चार्ज केल्यानंतर यात 80 टक्के बॅटरी लाईफ मिळत राहील.
- ओएस: फोन फनटच ओएस 14 आधारित आणि अँड्रॉईड 14 वर काम करतो. तर कंपनीने दावा केला आहे की डिव्हाईस सोबत 2 वर्षांचे अँड्रॉईड सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 3 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.
- इतर: फोनमध्ये 3000 mm² VC लिक्विड कूलिंग सिस्टम, अल्ट्रा गेम मोड, 4G गेम व्हायब्रेशन, AI फोटो एन्हान्स, AI इरेज, IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंग मिळत आहे.
iQOO Z9s Pro मध्ये काय आहे नवीन
iQOO Z9s सीरीजमध्ये आधीपासूनच Z9, Z9x आणि Z9 Lite समाविष्ट आहेत. iQOO Z9s Pro बद्दल सांगायचे झाल्यास तुम्हाला रिअर कॅमेऱ्यांसह 3D कर्व्ह डिस्प्ले आणि स्मार्ट ऑरा लाईट मिळेल. स्मार्ट ऑरा लाईटचा वापर पोर्ट्रेट शॉट्ससाठी केला जाऊ शकतो आणि ते इनकमिंग कॉल्स आणि मॅसेज यांना सूचित करण्यासाठी ते ‘डायनॅमिक लाईट’ म्हणून देखील कार्य करते.
iQOO Z9s Pro मध्ये AI फिचर्स देखील उपलब्ध आहेत. एआय इरेज तुम्हाला फोटोंमधून नको असलेल्या वस्तू काढून टाकता येते आणि एआय फोटो एन्हान्सरद्वारे तुमच्या फोटोंची गुणवत्ता सुधारण्यात मदत होते. iQOO Z9s Pro 4 वर्षांची बॅटरी लाईफ देण्याचा दावा केला जात आहे. या फोनला 4 वर्षांपर्यंत दररोज चार्ज केल्यानंतर 80 टक्के बॅटरी लाईफ मिळेल.














