चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमी आपल्या नंबर सीरिजमध्ये नवीन 4G हँडसेट लाँच करू शकते, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता Realme 10 4G स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. रियलमीचा हा बजेट स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला इंडोनेशियात लाँच होऊ शकतो आणि 11 नोव्हेंबरपासून याची विक्री सुरु होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन भारतात देखील नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. परंतु अधिकृत माहिती समोर आली नाही.
Realme 10 4G स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
Realme Indonesia च्या वेबसाइटवर या आगामी अपकमिंग स्मार्टफोनची अजून माहिती लीक झाली आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये पंच होल कटआउट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. हा स्मार्टफोन 6.5-इंचाचा डिस्प्ले, Full HD+ रिजोल्यूशनसह येऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असू शकते. हे देखील वाचा: 5G Supported Smartphones: या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर
या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 8GB एक्सटेंड रॅमचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G99 SoC मिळू शकते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाऊ शकतो. रियलमीचा हा फोन Android 12 आधारित Realme UI 3.0 वर चालू शकतो. AnTuTu वर या स्मार्टफोननं 4 लाखांपेक्षा जास्त स्कोर केला आहे.

Realme 10 India Price
Realme 10 4G स्मार्टफोनची विक्री इंडोनेशियामध्ये 11 नोव्हेंबरपासून सुरु होऊ शकते. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंट – 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. रियलमीचा हा फोन दोन कलर – रश व्हाइट आणि क्लॅश ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या रियलमी स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती 9 नोव्हेंबरच्या लाँचच्या दिवशी समजेल. या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅमसह सादर केला जाऊ शकतो, ज्याची किंमत 15,000 ते 17,000 रुपयांपर्यंत असू शकते. Realme 10 India price पाहता हा फोन सुमारे 17,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. लाँच ऑफर आणि बँक डिस्काउंटसह 15000 रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकतो. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; सोबत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.















