रिलायन्स जियो (Reliance Jio) नं 5G ची भेट दिल्यानंतर अलीकडेच आपल्या युजर्सना एक जोरदार झटका दिला होता. Akash Mukesh Ambani यांच्या कंपनीनं डिज्नी+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) ची फ्री सर्व्हिस देणारे अनेक प्रीपेड प्लॅन्स गुपचूप बंद केले होते. परंतु तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की अजूनही कंपनीचे दोन असे Prepaid Plan आहेत, ज्यांच्या सोबत डिज्नी+ हॉटस्टार फ्री मिळतं. जर तुम्ही Jio Users असाल आणि Disney Plus Hotstar Subscription Free असलेले Jio Prepaid Plan शोधत असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये त्यांची माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊया…
या दोन प्लॅनमध्ये मिळेल फ्री Disney+ Hotstar subscription
जियो कडे डिज्नी+ हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन देणारे आता फक्त दोन प्लॅन उरले आहेत. हे प्लॅन 1499 रुपये आणि 4199 रुपयांचे आहेत. चला वेळ न दवडता या दोन्ही प्लॅनमध्ये कंपनीकडून मिळणार सर्व बेनिफिट ऑफरची संपूर्ण माहिती घेऊया. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येतोय OPPO A98; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स आले समोर
Jio चा 1,499 रुपयांचा prepaid plan
या प्लॅन बद्दल बोलायचं तर यात युजर्सना 84 दिवसांच्या वैधतेसह डेली 2GB डेटा मिळतो. म्हणजे प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा वापरता येतो. डेटा संपल्यावर देखील युजर्सना 64kbps इंटरनेट स्पीडवर डेटा वापरता येतो. तसेच रिचार्जमध्ये रोज 100 SMS आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा देखील दिला जात आहे. एक्सट्रा बेनिफिट्स पाहता प्लॅनमध्ये डिज्नी+ हॉटस्टार सोबतच free JioTV, JioSecurity आणि JioCinema चं subscriptions मिळतं.
Jio चा 4,199 रुपयांच्या prepaid plan
Reliance Jio च्या 4,199 रुपयांच्या prepaid plan मध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB डेटा मिळतो. या रिचार्जमध्ये फ्री कॉलिंगसह डेली 100 SMS चा फायदा देखील दिला जात आहे. इतकेच नव्हे तर युजर्सना डिज्नी+ हॉटस्टार के फ्री सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity सारखे बेनिफिट्स मिळतात.
असं अॅक्टिव्हेट करा Disney+ Hotstar Premium annual subscription
- सर्वप्रथम https://www.hotstar.com/in/subscribe/promo वर जा.
- त्यानंतर तुमच्या जियो नंबरनं साइन-इन करून ओटीपी एंटर करा.
- त्यानंतर तुम्हाला MyJio account मध्ये Disney+ Hotstar premium code मिळेल.
- जो सबमिट केल्यानंतर सब्सक्रिप्शन अॅक्टिव्हेट करता येईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
















