फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच

Highlights

  • Infinix Hot 30i 8GB+8GB RAMला सपोर्ट करतो.
  • या फोनमध्ये 50MP Camera देण्यात आला आहे.
  • इनफिनिक्स हॉट 30आय स्वस्त Realme आणि Redmi स्मार्टफोन्सना आव्हान देतो.

Infinix Hot 30i आज भारतात लाँच झाला आहे. हा एक लो बजेट मोबाइल आहे जो कमी किंमतीत भारतीय बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन 50MP Camera, 16GB RAM (8GB RAM+8GB RAM), MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे. या प्राइस सेग्मेंटमध्ये इनफिनिक्स हॉट 30आय Realme आणि Redmi च्या स्वस्त स्मार्टफोन्सना आव्हान देतो. पुढे तुम्ही Hot 30i प्राइस व स्पेसिफिकेशन्स डिटेल्स वाचू शकता.

इनफिनिक्स हॉट 30आय चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ 90Hz Display
  • MediaTek Helio G37
  • 8GB RAM+8GB RAM = 16GB RAM
  • 50MP Dual AI Camera
  • 10W 5,000mAh Battery

Infinix Hot 30i स्मार्टफोन 6.6 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह काम करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत आणि फीचर्स लीक; 4 एप्रिलला होईल भारतात लाँच

इनफिनिक्स हॉट 30आय अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्यामुळे यात 16जीबी रॅमची पावर मिळते. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी हा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्याच्या सोबतीला फ्रंट फ्लॅश देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवर हे आहेत बेस्ट सेलिंग अफोर्डेबल आणि मिड रेंज स्मार्टफोन, पाहा लिस्ट

Infinix Hot 30i पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जो 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी एलटीई, 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here