OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत आणि फीचर्स लीक; 4 एप्रिलला होईल भारतात लाँच

Highlights

  • OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला भारतात लाँच होईल.
  • या फोनची किंमत 329 euro (जवळपास 29,000 रुपये) असू शकते.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी मध्ये 108MP Camera दिला जाऊ शकतो.

वनप्लसनं घोषणा केली आहे की कंपनी येत्या 4 एप्रिलला भारतात आपल्या ‘नॉर्ड’ सीरीजकॅच नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच करेल. कंपनीनं आतापर्यंत या फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत परंतुआ एका नवीन लीकमध्ये नॉर्ड सीई 3 लाइटच्या किंमतीसह अनेक महत्वाचे डिटेल्स समोर आले आहेत. या 5जी फोनमध्ये 108MP Camera आणि 67W SuperVOOC सारखे फीचर्स मिळू शकतात आणि याची किंमत 329 युरो असू शकते.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जीची लीक किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G प्राइस बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये 329 euro मध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही किंमत भारतीय करंसीनुसार 29,000 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते आणि यह नॉर्ड सीई 3 लाइट 5जीची प्रारंभिक किंमत असू शकते. लीकनुसार हा वनप्लस फोन Pastel Lime आणि Chromatic Gray कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: वाय-फाय कॉलिंग म्हणजे काय? कशाप्रकारे नेटवर्क नसताना VoWiFi च्या मदतीनं कॉल्स करायचे जाणून घ्या

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 108MP Triple Rear Camera
  • 5,000mAh battery
  • 67W SuperVOOC charging

OnePlus Nord CE 3 Lite 5G शी संबंधित लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे, जोडीला 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच भारतीय बाजारात नॉर्ड सीई 3 लाइट एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी च्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

लीकनुसार, OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन एलसीडी पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं सांगण्यात आलं आहे, जी 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. हे देखील वाचा: शाओमीनं लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन Redmi A2 आणि Redmi A2+, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

वनप्लस इंडिया लाँच

4 एप्रिलला OnePlus Nord CE 3 Lite 5G आणि OnePlus Nord Buds 2 भारतात लाँच केले जातील. हा ऑनलाईन लाँच इव्हेंट संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, युट्युब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर नॉर्ड सीई 3 लाइट 5जीचं प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे तसेच याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर फोनची विक्री होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here