स्वस्त स्मार्टफोन POCO C65 येत आहे भारतात! लाँचच्या आधी समोर आला फोटो, मिळेल 50MP Camera

POCO C65 गेल्याच महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. 50MP Camera आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरवर चालत असलेला हा स्वस्त स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. कंपनीने याची घोषणा करण्याच्या आधीच 91मोबाइल्सला पोको सी 65 चा एक्सक्लूसिव्ह फोटो मिळाला आहे ज्यात फोनचा रियर लुक आणि डिजाइन सोबतच याचे Purple कलर व्हेरिएंटचा पण खुलासा झाला आहे.

POCO C65 फोटो आणि एक्सक्लूसिव्ह माहिती

  • 91मोबाइल्सला पोको सी65 चा मार्केटिंग मटेरियल मिळाला आहे ज्यात फोनच्या बॅक साइडला दाखवण्यात आले आहे.
  • फोटोमध्ये POCO C65 Purple कलरमध्ये दिसत आहे, जो या रंगाचे कपडे घातलेल्या मॉडेलच्या हाथामध्ये दिसत आहे.
  • येथे फोनची बॅक साइड दिसत आहे ज्यात दोन मोठे रिंग असलेला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • कॅमेरा सेटअपच्या साइटमध्ये एलईडी फ्लॅश लाइट लावण्यात आली आहे, तसेच यामध्ये 50MP लेन्स पण आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर POCO ची ब्रँडिंग पण आहे जो पॅनलच्या वरच्या भागावर देण्यात आली आहे.
  • फोटोमध्ये फोनचा रिअर पॅनल फ्लेट दिसत आहे ज्यात ऐज राउंड शेप देण्यात आले आहेत.

POCO C65 स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन: पोको सी65 4जी फोनमध्ये 6.74 इंच की मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. हा वॉटरड्रॉप नॉच स्टाइल डिस्प्ले आहे जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 600निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीनला गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट करण्यात आले आहे.
  • प्रोसेसर: POCO C65 ग्लोबल मार्केटमध्ये अँड्रॉइड 13 आधरित मीयुआय 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • मेमरी: विस्वदेशी बाजारात हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर आ​र्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी POCO C65 स्मार्टफोनमध्ये 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी यामध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here