5,200mAh Battery सह आला Honor Play 40C 5G फोन, लवकरच होऊ शकते भारतात एंट्री

Highlights

  • Honor Play 40C चीनमध्ये लाँच झाला आहे.
  • हा ब्रँड भारतात रि-लाँच होऊ शकतो.
  • Madhav Sheth ऑनरला भारतात आणू शकतात.

Honor phone भारतात रि-लाँच होऊ शकतात. रियलमीला सोडल्यानंतर माधव सेठ ऑनरशी जोडले जाऊ शकतात तसेच पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये ऑनर स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात. भारतीय बाजारात येण्यापूर्वी ऑनरनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Honor Play 40C लाँच केला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Honor Play 40C चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : ऑनर प्ले 40सी स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : ह्या ऑनर फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो मॅजिकओएस 7.1 सह चालतो.
  • रॅम : Honor Play 40C चायना मध्ये 6 जीबी रॅमसह लाँच झाला आहे. ह्या फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा मोबाइल सिंगल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलची लेन्स आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ऑनर प्ले 40सी स्मार्टफोन 5,200एमएएचची मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • अन्य फीचर्स : Honor Play 40C मध्ये ड्युअल सिम, 5जी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससह एनएफसी सारखे फीचर्स मिळतात. ह्या फोनची थिकनेस फक्त 8.35एमएम आणि वजन 188 ग्राम आहे.

Honor Play 40C ची किंमत

चीनी बाजारात हा ऑनर फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा 6GB+128GB सह 899 युआन मध्ये विकत घेता येईल जे भारतीय करंसीनुसार 10,300 रुपये होतात. फोन चीनमध्ये Magic Night Black, Ink Jade Green आणि Sky Blue कलरमध्ये आला आहे. कदाचित Honor Play 40C पुढील महिन्यात भारतात देखील लाँच होऊ शकतो.

Honor देणार Realme-Redmi ला टक्कर?

ऑनर हुवावेचा सब-ब्रँड आहे. अद्याप कंपनीनं भारतात येण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु जर हा ब्रँड भारतीय बाजारात पुन्हा सक्रिय झाला तर ह्याच्या थेट फायदा सामान्य मोबाइल युजर्सना मिळेल. मार्केटमध्ये अजून एक मोबाइल ब्रँड उपलब्ध झाल्यामुळे Realme, Redmi, OPPO, Vivo आणि POCO जसे की ब्रँड्सच्या समोर आणखी एक प्रतिस्पर्धी येईल आणि स्पर्धा वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here