5G In India: फक्त काही तास शिल्लक! भारतात ‘5जी’ची प्रतीक्षा संपणार

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

5G Launch In India: भारतात 5जी लाँच (5G Service Live) ची प्रतीक्षा संपण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर म्हणजे उद्या शनिवारी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5जी सेवेचे उदघाटन करतील. 1 October पासून 4 दिवस चालणाऱ्या इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमातून देशातील नेक्स्ट जनरेशन (5th Generation Mobile Network) नेटवर्क म्हणजे 5G सुरु करण्यात येईल.

भारतात अधिकृतपणे 5G सुरु होण्यासाठी फक्त काही तास उरले असताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. 5G लाइव्ह झाल्यानंतर 5G सिम (5G SIM) कसं मिळेल, 5G प्लॅन (5G Recharge) कसे असतील आणि कोणती कंपनी (Reliance Jio, Vodafone Idea, Airtel) सर्वप्रथम भारतात आपलं 5G नेटवर्क लाँच करेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे देखील वाचा: सिंगल चार्जवर मुंबई ते गोवा प्रवास; Tiago EV नंतर टाटा लाँच करागी तीन नवीन Electric Car

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

5G नेटवर्क म्हणजे काय?

जगभरात 5जीची सुरुवात झाली आहे आणि भारतात देखील लवकरच हे लाँच केलं जाईल. 5G मुळे मोबाइल मध्ये इंटरनेट स्पीड मेगाबाइटवरून गीगाबाइटवर जाईल आणि यात 1gbps म्हणजे 4जी पेक्षा 100 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल. 5जी टेक्नॉलॉजी फक्त मोबाइल फोनपर्यंत मर्यादित रहाणार नाही तर बल्ब, पंखे, फ्रिज आणि कार देखील 5जीशी कनेक्ट होतील. 5G मध्ये IOT वर मोठं काम होईल आणि या टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्व अप्लायंस व डिवाइसना एकमेकांशी जोडले जातील. दुसऱ्या शहरात जाऊन देखील तुम्ही तुमच्या घरातील डिवाइसना तुमच्या स्मार्टफोनवरून कमांड देऊ शकाल. म्हणजे मुंबईत बसून तुम्ही तुमच्या पुण्यातील घराचा बल्ब ऑन करू शकाल. 5जीच्या माध्यमातून हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, कारखाने, मॉल, एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉटेल सारख्या ठिकाणी सर्व सिस्टम एकमेकांशी कनेक्टड राहतील. मोबाईल इंटरनेट स्पीड पाहता, काही मिनिटांत 1जीबी पर्यंतची मुव्ही डाउनलोड होईल.

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

या 13 शहरांमध्ये 2022 मध्ये सर्वप्रथम मिळेल 5G सर्व्हिस

तुम्हाला आठवत असेल की यंदा डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशंस (DoT) नं माहिती दिली होती की भारतात 5G रोलआउट नंतर 13 शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. 2022 मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगढ, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. परंतु डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशननं कोणती टेलिकॉम कंपनी सर्वप्रथम 5G सर्व्हीस व्यवसायिकरित्या रोल आउट करेल, हे अधिकृतपणे सांगितलं नाही. परंतु असं वाटत आहे की जियो, एयरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या 5G लाँचिंगमध्ये काही दिवस किंवा तासांचा फरक असू शकतो.

5G SIM

आगामी 5G Network साठी सर्व टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना नवीन सिम कार्ड घेण्यास सांगतील की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही. परंतु अलीकडेच एयरटेलनं स्पष्ट केलं होतं की Airtel 5G नेटवर्कसाठी ग्राहकांकडे एक 5G सपोर्टेड फोन असणं आवश्यक आहे. म्हणजे 5जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करण्यासाठी नवीन सिम कार्ड गरज नाही असाच अर्थ यातून काढता येईल. परंतु रिलायन्स जियो आणि वोडाफोन आयडियाकडून 5G सिम बाबत असं कोणतंही विधान करण्यात आलं नाही.

5G Plans Price

लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार टेलीकॉम कंपन्या सुरुवातीला 5जी सेवेसाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेणार नाहीत. कारण त्यानं 4 जी युजर्सना नवीन मोबाइल नेटवर्कची सवय लावावी लागेल. एका रिपोर्टमध्ये तज्ज्ञांचा हवाला देत संकेत देण्यात आला आहे की 5G लाँचनंतर किंमत वाढवली जाईल. परंतु हे लवकर होणार नाही कारण 5G हँडसेट अजूनही थोडे महाग आहेत.

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Analysys Mason चे भारतीय प्रमुख रोहन धमीजा यांनी म्हटलं आहे, “5जी ऑपरेटर सुरुवातीला 4जी पेक्षा प्रीमियम चार्ज करण्याची शक्यता नाही कारण सुरुवातीला त्यांचं लक्ष 5जी वापर वाढवणे, जास्त युजर्सना वेगाचा अनुभव देणं, जास्त डेटा वापरणं आणि त्यामुळे एआरपीयू वाढवण्यावर असेल.” हे देखील वाचा: लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये आणखी एका दणकट स्मार्टफोन एंट्री; स्वस्तात Redmi Note 11R लाँच

4जी फोनमध्ये चालेल 5जी सिम?

5G सर्व्हिस अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागेल, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे 4G स्मरफोनवर 5G नेटवर्क उपलब्ध होणार नाही. उलट 5जी मोबाइल फोनमध्ये 5जी सह 4जी, 3जी आणि 2जी नेटवर्कचा देखील वापर करता येईल. परंतु 4जी फोनमध्ये 5जी नेटवर्क चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here