90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Moto E22s ची भारतात एंट्री

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

गेल्या आठवड्यात बातमी आली होती की मोटोरोला आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. तेव्हा हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट देखील करण्यात आला होता. मोटोरोलानं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन मोटो ई22एस लाँच केला आहे. हा मोटोरोला मोबाइल 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 90Hz Display, 16MP AI Camera, 4GB RAM, MediaTek Helio G37 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

Moto E22s Specifications

मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 268पीपीआयला सपोर्ट करती आहे. मोटो ई22एस स्मार्टफोन आयपी52 रेटिंगसह आला त्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांपासून याचे संरक्षण होते. या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 163.95 x 74.94 x 8.49एमएम आणि वजन 185ग्राम आहे. हे देखील वाचा: मोबाइलच्या जागी साबणाच्या वड्या मिळू नये यासाठी काय करावं? Online Shopping करताना ‘या’ टिप्स फॉलो करा

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

Moto E22s अँड्रॉइड 12 आधारित माययूक्सवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. भारतात मोटो ई22एस 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मध्ये लाँच झाला आहे जो 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटो ई22एसच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. ताईच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोटोरोला मोबाइलमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Motorola Moto E22s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला ई22एस मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या रेंजमध्ये 64MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

Moto E22s Price In India

Moto E22s चा एकमेव मॉडेल भारतात सादर करण्यात आला आहे, ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. या एकमेव मॉडेलची भारतात किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून आणि अन्य रिटेल स्टोर्सवर 22 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीनं Moto E22s स्मार्टफोन Arctic Blue आणि Eco Black कलरमध्ये सादर केला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here